CoronaVirus: Delhi Connection of Aundha Nagnath; Quarantine one and get a swab for inspection | CoronaVirus : औंढ्यातही दिल्ली कनेक्शन; एकास क्वारंटाईन करून तपासणीसाठी स्वॅब घेतला

CoronaVirus : औंढ्यातही दिल्ली कनेक्शन; एकास क्वारंटाईन करून तपासणीसाठी स्वॅब घेतला

औंढा नागनाथ : दिल्लीतील मरकज येथील तबलिगी जमातमध्ये औंढ्यातिल काहीजण सहभागी झाले होते, त्यापैकी एकाला पोलिसांनी शोधून हिंगोलीतील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले. येथे त्याचे स्वॅब नमुने  घेण्यात आले असून तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे.

औंढानागनाथ येथील काही भाविक दिल्लीतील मरकज येथील तबलिगी जमातमध्ये सहभागी असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक वैनाथ मुंढे  , पोलीस कॉन्स्टेबल राजेश सुर्वे, शेख,ए.एस.आय. विरकर ,गोरे यांनी दोन दिवस शोध मोहीम राबवत एकास ताब्यात घेतले आहे. बुधवारी रात्री त्याला हिंगोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्याचे स्वॅब नमुने पुणे येथे प्रयोगशाळेमध्ये तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या त्यास आरोग्य विभागाने हिंगोली येथील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. 

दरम्यान, दिल्ली येथून शहरात परतल्यानंतर त्याच्या संपर्कात कोण आले होते तसेच आणखी कितीजण दिल्लीवरून परतले होते याची माहिती प्रशासकीय यंत्रणा घेत आहे. 

Web Title: CoronaVirus: Delhi Connection of Aundha Nagnath; Quarantine one and get a swab for inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.