coronavirus : हिंगोलीत आणखी ५ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 22:33 IST2020-05-29T22:32:14+5:302020-05-29T22:33:07+5:30
वसमत तालुक्यात 4 पॉझिटिव्ह

coronavirus : हिंगोलीत आणखी ५ कोरोना पॉझिटिव्ह
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा पाचने वाढली आहे. आता एकूण रुग्णसंख्या १७१ झाली असून ९६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आता उपचारार्थ दाखल असलेल्यांची संख्या ७५ वर पोहोचली आहे.
शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालात ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यातील चारजण वसमत तालुक्यातील तर एक जण सेनगाव तालुक्यातील आहे. सेनगाव येथील क्वारंटाईनमध्ये असलेला हा एकजण मुंबईहून आलेला आहे. उर्वरितांची हिस्ट्री तपासण्याचे काम सुरू होते.