कोरोनाचा कहर सुरूच; नव्याने आढळले ४४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:27 IST2021-03-15T04:27:37+5:302021-03-15T04:27:37+5:30
जिल्हाभरात हिंगोली, कळमनुरी, सेनगाव व वसमत परिसरात रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट कॅम्पमध्ये २९२ जणांची तपासणी केली. यामध्ये १० रुग्ण ...

कोरोनाचा कहर सुरूच; नव्याने आढळले ४४ रुग्ण
जिल्हाभरात हिंगोली, कळमनुरी, सेनगाव व वसमत परिसरात रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट कॅम्पमध्ये २९२ जणांची तपासणी केली. यामध्ये १० रुग्ण आढळून आले. यात हिंगोली परिसरातील आदर्श कॉलनी १, जिजामातानगर १, तर रिसाला बाजार ४ रुग्ण आढळले आहेत. तसेच कळमनुरी परिसरात वाशीम १, वसमत परिसरात बोराळा २, तर श्रीनगर येथे १ रुग्ण आढळला. आरटीपीसीआरमध्ये ३४ रुग्ण आढळून आले. यात हिंगोली परिसरात पलटन १, महादेववाडी १, सावरखेडा १, आंबेडकरनगर १, बावनखोली १, नर्सी नामदेव १, देवडा नगर १, तलाब कट्टा १, मारवाडी गल्ली १, अकोला बायपास १, सिव्हिल हॉस्पिटल १, कोमटी गल्ली १, मंगळवारा १, रिसाला बाजार १, इंदिरानगर १, इडोळी १, शिवाजीनगर १, गाडीपुरा १, बासंबा १, रामकृष्णानगर १, रिसोड १, लाख १, वंजारवाडा १, सरस्वतीनगर १, रिसाला बाजार १, अंभेरी १ असे २६ रुग्ण आढळून आले. सेनगाव परिसरात गोरेगाव २, पिंपरी १, कनेरगाव १ असे ४ रुग्ण आढळले. तसेच कळमनुरी परिसरात आखाडा बाळापूर २, तुळजाभवानीनगर येथे २ असे एकूण ४ रुग्ण आढळून आले.
आजपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ७५६ झाली आहे. यापैकी ४ हजार २७१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजघडीला ४२० रुग्णांवर उपचार सुरू असून, आजपर्यंत ६५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या २३ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तसेच ६ रुग्णांची प्रकृती अतीगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
रविवारी ९४ रुग्ण झाले बरे
जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढत असताना, रविवारी तब्बल ९४ रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेले ६४, लिंबाळा कोरोना केअर सेंटरमधील १५, कळमनुरी कोरेाना केअर सेंटरमधील ४, वसमत येथील कोरोना केअर सेंटरमधील १०, तर औंढा नागनाथ येथील कोरोना केअर सेंटरमधील १ रुग्णाचा समावेश आहे.