कोरोनाचा जिल्ह्यातून काढता पाय; नवा एकही रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST2021-07-05T04:19:14+5:302021-07-05T04:19:14+5:30

जिल्ह्यात रविवारी हिंगोली परिसरात १५७, कळमनुरी ८६, सेनगाव परिसरात ४ अशा २४६ जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती. ...

Corona's feet removed from the district; No new patients | कोरोनाचा जिल्ह्यातून काढता पाय; नवा एकही रुग्ण नाही

कोरोनाचा जिल्ह्यातून काढता पाय; नवा एकही रुग्ण नाही

जिल्ह्यात रविवारी हिंगोली परिसरात १५७, कळमनुरी ८६, सेनगाव परिसरात ४ अशा २४६ जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती. त्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तसेच हिंगोली परिसरात ६२, कळमनुरी १४४, औंढा ३२, वसमत ४२, सेनगाव परिसरात १२ अशा २८२ जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली असता एकही रुग्ण आढळला नाही. तर हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डात उपचार घेणारे ६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र हिंगोलीतील औंढा रोडवरील नवीन कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सावळी तांडा येथील ४१ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात १५ हजार ९५० रुग्ण आढळून आले. त्यापैकी १५ हजार ५४४ रुग्ण बरे झाले. तसेच आतापर्यंत ३८४ रुग्णांचा मृत्यू झाला. आजघडीला २२ रुग्णांवर उपचार सुरू असून यातील १४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

Web Title: Corona's feet removed from the district; No new patients