हिंगोली जिल्ह्यात ८८९ जणांचे कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST2021-03-05T04:30:04+5:302021-03-05T04:30:04+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील २२ शासकीय आरोग्य संस्था व दोन खाजगी दवाखान्यांत ४ मार्च रोजी ८८९ जणांनी लस घेतली. यामध्ये ...

Corona vaccination of 889 people in Hingoli district | हिंगोली जिल्ह्यात ८८९ जणांचे कोरोना लसीकरण

हिंगोली जिल्ह्यात ८८९ जणांचे कोरोना लसीकरण

हिंगोली : जिल्ह्यातील २२ शासकीय आरोग्य संस्था व दोन खाजगी दवाखान्यांत ४ मार्च रोजी ८८९ जणांनी लस घेतली. यामध्ये ६० वर्षांवरील ५७४ व्यक्तींनी लसीकरणाचा लाभ घेतला.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहात आरोग्य कर्मचारी १९, इतर विभागातील कर्मचारी ५०, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १२, ४५ ते ६० वर्षांखालील इतर आजार असणाऱ्या व लस घेणाऱ्यांची संख्या ४२, साठ वर्षांवरील लस घेणाऱ्यांची संख्या ७१, उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथे आरोग्य कर्मचारी २, इतर विभागातील कर्मचारी २१, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३०, साठ वर्षांखालील इतर आजार असणारे १६, साठ वर्षांवरील ७१, प्रा.आ. केंद्र पोत्रा येथे आरोग्य कर्मचारी ६, इतर विभागातील कर्मचारी १, दुसरा डोस घेणारे १५, साठ वर्षांखालील २, साठ वर्षांवरील ३, प्रा.आ. केंद्र, वाकोडी दुसरा डोस घेणारे २, प्रा.आ. केंद्र, मसोड येथे आरोग्य कर्मचारी २, दुसरा डोस घेणारे २, साठ वर्षांखालील ६, साठ वर्षांवरील ६०, प्रा.आ. केंद्र, आखाडा बाळापूर येथे आरोग्य कर्मचारी १७, इतर विभागांतील कर्मचारी ३, दुसरा डोस घेणारे ३, ६० वर्षांखालील २४, साठ वर्षांवरील ३०, प्रा.आ. केंद्र, डोंगरकडा येथे दुसरा डोस घेणारे ९, साठ वर्षांखालील ४, साठ वर्षांवरील ३५, प्रा.आ. केंद्र, रामेश्वर तांडा आरोग्य कर्मचारी १, दुसरा डोस घेणारे ७, ग्रामीण रुग्णालय औंढा येथे आरोग्य कर्मचारी २, दुसरा डोस घेणारे १३, साठ वर्षांखालील २३, साठ वर्षांवरील ४२, प्रा.आ. केंद्र, शिरडशहापूर, उपजिल्हा रुग्णालय, वसमत येथे आरोग्य कर्मचारी १, इतर विभागातील कर्मचारी १४, दुसरा डोस घेणारे ८, साठ वर्षांखालील २, साठ वर्षांवरील ४९, प्रा.आ. केंद्र, कुरुंदा येथे दुसरा डोस ३, साठ वर्षांखालील ५, साठ वर्षांवरील १९, प्रा.आ. केंद्र, हट्टा येथे आरोग्य कर्मचारी ९, साठ वर्षांवरील १०, ग्रामीण रुग्णालय, सेनगाव येथे इतर विभागांतील १, दुसरा डोस घेणारे ६, साठ वर्षांवरील ३६, प्रा.आ. केंद्र, गोरेगाव येथे आरोग्य कर्मचारी १, इतर विभागातील १, साठ वर्षांखालील २, साठ वर्षांवरील २४, प्रा.आ. केंद्र, कवठा येथे दुसरा डोस २, साठ वर्षांखालील ६, साठ वर्षांवरील ३७, प्रा.आ. साखरा येथे आरोग्य कर्मचारी ३, साठ वर्षांवरील ११, प्रा.आ. केंद्र, कापडसिंगी येथे आरोग्य कर्मचारी ४, दुसरा डोस घेणारे २, साठ वर्षांखालील ४, साठ वर्षांवरील १४, माधव बाग हाॅस्पिटल येथे ६० वर्षांखालील १९, साठ वर्षांवरील ६२ जणांनी लस घेतली. एकूण लसीकरण ८८९ झाले आहे.

Web Title: Corona vaccination of 889 people in Hingoli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.