काेराेनाबाधित दुचाकीवरून केअर सेंटरमध्ये दाखल, हिंगोली जिल्ह्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 05:48 IST2021-03-18T05:47:56+5:302021-03-18T05:48:35+5:30

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्याकडे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

Corona patient reach at the care center on bike in Hingoli district | काेराेनाबाधित दुचाकीवरून केअर सेंटरमध्ये दाखल, हिंगोली जिल्ह्यातील प्रकार

काेराेनाबाधित दुचाकीवरून केअर सेंटरमध्ये दाखल, हिंगोली जिल्ह्यातील प्रकार

सेनगाव (जि. हिंगोली) : आरोग्य विभागाच्या कामचुकार कारभारामुळे कोरोनाबाधित रुग्णाला नातेवाइकांच्या मदतीने मोटरसायकलवरून केअर सेंटरला दाखल व्हावे लागले. सेनगाव ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडला असून कोरोनासारख्या संसर्गजन्य गंभीर आजारातही ग्रामीण रुग्णालय आपला आळस झटकायला तयार नसल्याचेच यावरून दिसून येते आहे.

सेनगाव तालुक्यातील दाताडा येथील ६७ वर्षीय रुग्णाचा 
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्याकडे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची विनंती केली. मात्र, त्याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्षच दिले नाही. अखेरीस त्या रुग्णाला नातेवाइकांनी चक्क मोटरसायकलवरून कोविड सेंटरला सोडले. यासंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

रुग्णांचे हाल 
- सेनगाव ग्रामीण रुग्णालयात अनेक दिवसांपासून रुग्णवाहिका नाही. गंभीर आजारी किवा कोरोनाबाधित रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेचाच आधार घ्यावा लागतो. 
- अशा परिस्थितीत संपूर्ण तालुक्यासाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका ऐनवेळी उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत ग्रामीण रुग्णालय प्रशासन हात वर करते. रुग्णवाहिकेअभावी अनेक रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे.
 

Web Title: Corona patient reach at the care center on bike in Hingoli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.