शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

कोरोनाने एकाचा मृत्यू: नव्याने ३४ रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST

जिल्ह्यात रॅपिड ॲंटीजेन टेस्ट कॅम्पमध्ये ८०२ जणांची तपासणी केली असता यात १० कोरोना बाधित रूग्ण आढळले. हिंगोली परिसरातील ५ ...

जिल्ह्यात रॅपिड ॲंटीजेन टेस्ट कॅम्पमध्ये ८०२ जणांची तपासणी केली असता यात १० कोरोना बाधित रूग्ण आढळले. हिंगोली परिसरातील ५ रूग्ण असून यात शिवराम नगर १, कपडा गल्ली १, खुशालनगर १, अंतुले नगर १, बियाणी नगर १ येथील रूग्णांचा समावेश आहे. वसमत परिसरात २ रूग्ण आढळले असून यात पांगरा शिंदे १, रांजोना येथील १ रूग्णाचा समावेश आहे. कळमनुरी परिसरातील वारंगा फाटा १, सेनगाव परिसरातील सापटगाव १, तसेच औंढा परिसरातील जवळा बाजार येथे १ रूग्ण आढळून आला. आरटीपीसीआर टेस्टमध्येही एकूण २४ रूग्ण आढळून आले. हिंगोली परिसरात २० रूग्ण आढळले असून यात गंगानगर २, सरस्वतीनगर २, श्रीनगर १, ग्रामीण पोलीस ठाणे जवळ १, तिरूपती नगर १, सुराणा नगर १, रिसाला बाजार ३, अकोला बायपास १, सामान्य रूग्णालय १, देव गल्ली १, टी.व्ही. सेंटर १, आमला १, एनटीसी २, गाडीपुरा १, लासीना येथील १ रूग्णांचा समावेश आहे. औंढा परिसरात २ रूग्ण आढळले असून यात लाख १, जवळा बाजार येथील १ रूग्णाचा समावेश आहे. तसेच कळमनुरी परिसरात २ रूग्ण आढळले असून यात भीमनगर १, येळी येथील १ रूग्णाचा समावेश आहे. हिंगोली येथील आयसोलेशन वार्डात उपचार घेणाऱ्या माळहिवरा येथील एका ८० वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णाचा आकडा ६४ वर पोहचला आहे.

दरम्यान, ८ मार्च रोजी ३२ रूग्ण बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यात जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेणाऱ्या २७, तर लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटरमधील ५ रूग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत कोरोना रूग्णांचा संख्या ४ हजार ४३७ झाली असून यापैकी ४ हजार १४ रूग्ण बरे झाले आहेत. आजघडीला ३५९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या २२ रूग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तसेच ४ रूग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा रूग्णालय प्रशासनाने दिली.