कोरोनाचे नवे १२८ रुग्ण तर १६७ जण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST2021-05-07T04:31:21+5:302021-05-07T04:31:21+5:30
कोरोनाचे १६७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यात जिल्हा रुग्णालयातून ६३, लिंबाळा येथून २३, वसमत येथून २३, ...

कोरोनाचे नवे १२८ रुग्ण तर १६७ जण बरे
कोरोनाचे १६७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यात जिल्हा रुग्णालयातून ६३, लिंबाळा येथून २३, वसमत येथून २३, कळमनुरीतून ३० औंढा येथून १७ तर सेनगावातून ११ जणांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत कोरोनाचे एकूण १३ हजार ७६५ रुग्ण आढळून आले. यापैकी १२ हजार ४९० जण बरे झाले आहेत. तर १,०११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ४१७ जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर अतिगंभीर ४२ जणांना बायपाॅपवर ठेवण्यात आले आहे.
सात जणांचा मृत्यू
हिंगोली येथील आयसोलेशन वार्डात दाखल असलेल्या सात जणांचा मृत्यू झाला. यात वाशिमची ६५ वर्षीय महिला , वाई, ता. कळमनुरी येथील ६२ वर्षीय महिला, बोरी सावंत येथील ६५ वर्षीय पुरुष, केसापूर येथील ६२ वर्षीय पुरुष, इडोळी येथील ६० वर्षीय पुरुष, जवळा बाजार येथील ५० वर्षीय पुरुष, भटसावंगी येथील ८० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
वरचेवर होताहेत ऑक्सिजन बेड रिकामे
आता जिल्ह्यात ऑक्सिजन बेड रिकामे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. विविध सहा ठिकाणच्या शासकीय कोविड सेंटरमध्ये ७६ बेड रिकामे झाले आहेत. तर खासगी रुग्णालयांतही ४५ बेड उपलब्ध आहेत.