कोरोनाचे दोन रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:34 IST2021-08-21T04:34:24+5:302021-08-21T04:34:24+5:30

अँटिजन चाचणीत हिंगोली १४, सेनगाव ७४, औंढा ४३, कळमनुरी ८५, वसमत १४ अशी २३० जणांची तपासणी करूनही कुणी बाधित ...

Corona cures two patients | कोरोनाचे दोन रुग्ण बरे

कोरोनाचे दोन रुग्ण बरे

अँटिजन चाचणीत हिंगोली १४, सेनगाव ७४, औंढा ४३, कळमनुरी ८५, वसमत १४ अशी २३० जणांची तपासणी करूनही कुणी बाधित आढळले नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली १६, औंढा ७, वसमत ४१, कळमनुरी ७१ अशी १३५ जणांची तपासणी केली असता एकही बाधित नाही. तर आज नवीन कोविड सेंटरमधून बरे झालेल्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १६ हजार २१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १५ हजार ६२२ जण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजपर्यंत एकूण ३९१ जणांचा मृत्यू झाला. सध्या आठ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवले आहे. तर अन्य दोन अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: Corona cures two patients