कोरोनाचे नवे ३२ रुग्ण; ४५ जण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:22 AM2021-06-01T04:22:43+5:302021-06-01T04:22:43+5:30

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये ४४४ पैकी ११ बाधित आढळले. हिंगोली परिसरात ६९ जणांपैकी वायचाळ पिंप्री येथे ...

Corona 32 new patients; 45 people are healed | कोरोनाचे नवे ३२ रुग्ण; ४५ जण बरे

कोरोनाचे नवे ३२ रुग्ण; ४५ जण बरे

Next

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये ४४४ पैकी ११ बाधित आढळले. हिंगोली परिसरात ६९ जणांपैकी वायचाळ पिंप्री येथे १, वसमत परिसरात १२७ पैकी पांगरा शिंदे १, सेनगाव परिसरात ८२ पैकी वडोळी १, गोरेगाव १, कळमनुरी परिसरात १४६ पैकी हदगाव ४ व देवजना येथे एक बाधित आढळला. औंढा परिसरात २० पैकी लाख येथे दोन बाधित आढळले. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात केसापूर १, जिजामातानगर ३, मंगळवारा १, सावा १ असे ६ रुग्ण आढळले. वसमत परिसरात खांबाळा १, इंजनगाव २ असे तीन रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात गंगापूर १, काडकद १, भाटेगाव १, सुकळी १, सालवाडी २ व उमरवाडी १ असे ७ रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात संतुकपिंप्री येथील एक रुग्ण आढळला. औंढा परिसरात शिरड शहापूर २, नालेगाव १, पारडी १ असे ४ रुग्ण आढळले. आज ४५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयातून २७, कळमनुरी १२, सेनगाव २, लिंबाळा ३ व औंढा येथून एकास डिस्चार्ज दिला.

आज दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यात भटसावंगी येथील ५६ वर्षीय महिला लिंबाळा येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५ हजार ६८० रुग्ण झाले असून, त्यापैकी १५ हजार ०१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजघडीला जिल्ह्यात एकूण ३१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ३६१ व्यक्तींचा मृत्यू झाला. सध्या दाखल रुग्णांपैकी १२७ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. तर २० रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: Corona 32 new patients; 45 people are healed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.