शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

काँग्रेस-राकाँचाच वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:41 AM

तालुक्यातील आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी १३ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. यामध्ये १८ पैकी १0 जागा जिंकून काँग्रेस व राकाँने वर्चस्व मिळविले. मात्र आठ जागा जिंकणारी सेना-भाजप युतीही सत्तेवर दावा करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : तालुक्यातील आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी १३ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. यामध्ये १८ पैकी १0 जागा जिंकून काँग्रेस व राकाँने वर्चस्व मिळविले. मात्र आठ जागा जिंकणारी सेना-भाजप युतीही सत्तेवर दावा करीत आहे.१४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेपासून १३ टोबलवर सहा फेऱ्याद्वारे मतमोजणीचे नियोजन करण्यात आले. दुपारी ३ वाजेपर्यत निकाल घोषित करण्यात आला. जलालधाबा येथील दोन उमेदवारामंध्ये एका मताचा फरक असल्याने दुबार मतमोजणी झाली. यात एक तासाच्या वर वेळ लागला.जलालधाबा गणातील विठ्ठल पोले यांना ७६१ मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश लोंढे यांना ७६० मते पडली. गणेश लोंढे यांनी फेरमतमोजणी करण्याची विनंती निवडणूक निर्णय अधिकाºयाकडे केली. त्यानुसार फेरमतमोजणी होऊन विठ्ठल पोले यांना ७६१ तर गणेश लोंढे यांना ७५९ मते पडली.निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी विठ्ठल पोले यांना विजयी घोषित केले. मतमोजणीस तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे, गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी, गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे, सतीश पाठक, विलास तेलंग, श्रीराम पाचपुते, पी.एन ऋषि, जी.एस. राहीरे, व्यंकट केंद्रे, शिवसाब घेवारे आदी उपस्थित होते.नवनिर्वाचित संचालक हलविलेनिवडणुकीतील बिनविरोधपैकी कुणी संभ्रम केल्यास संख्या समसमान होणार असल्यामुळे पळवापळवीची दाट शक्यता आहे. दोन्ही बाजूने आपल्या पॅनलचे विजयी उमेदवार सुरक्षितस्थळी तातडीने हलविल्याचे वृत्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून असे करण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. कोणताच धोका पत्करायचा नाही असे सूचक विधान त्यांनी केले.दोन दत्तांमध्ये पुन्हा झुंजकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांचे चिरंजीव दत्ता बोंढारे व माजी खासदार शिवाजी माने यांचे पुतणे दत्ता माने यांच्यामध्येच सभापतीपदासाठी झुंज होणार आहे. प्रशासक म्हणून दत्ता माने यांची निवड जवळपास निश्चित झाल्यानंतर संजय बोंढारे यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावून त्याला स्थगिती मिळविली होती. निवडणूक घेण्यासाठी कोर्टाला विनंती केली. त्यामुळे प्रशासक पद निश्चित झाल्यानंतरही ते दत्ता माने यांना मिळाले नाही. त्यामुळे दोन्ही दत्तांमध्ये आताही सभापतीपदासाठी चुरस असणार आहे.हे आहेत विजयी उमेदवारबाळापूर- दत्ता बोंढारे-१३२० मतेशेवाळा- दत्तत्रय माने १३५९घोडा- भरत देशमुख ११५८कांडली- किशनराव कोकरे ११७८वारंगा फाटा -नितीन कदम १०५८डोंगरकडा -मीराबाई अडकिणे १४६५जवळा पां.- मारोती पवार बिनविरोधदांडेगाव -साहेबराव जाधव बिनविरोधपेठवडगाव -बालासाहेब पतंगे १०३०सिंदगी -अनिल रणखांब बिनविरोधनांदापूर -वसंतराव देशमुख ९३०पिंपळदरी-संजय भुरके १०४८जलालधाबा-विठ्ठलराव पोले ७६१लाख- कावेराबाई साबळे बिनविरोधकोथळज - धुरपत पाईकराव ९६२व्यापारी - सुनील अमिलकंठवार १७व्यापारी -बालासाहेब गावंडे २०हमाल-मापाडी - शेख गौस २४ईश्वरचिठ्ठी काँग्रेसच्या पारड्यात....व्यापारी मतदारसंघात अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महेश गोविंदवार व काँग्रेसचे सुनील अमिलकंठवार यांना बरोबरीची मते पडली. त्यानंतर ईश्वरचिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात भाग्य काँग्रेसच्या पदरात पडले आणि काँग्रेसचे सुनील अमिलकंठवार यांची यांना विजयी म्हणून घोषित केले. याच जागेने बहुमताचा आकडा गाठला.घोषणांनी परिसर दुमदुमलाविजयी उमेदवार जाहीर होताच कार्यकर्ते जल्लोष करत विजयाच्या घोषणा देत होते. गुलालाची उधळण होत होती. तहसील समोर हिंगोली-नांदेड मुख्य रस्त्यावर कार्यकर्ते गर्दी करत होते.

टॅग्स :ElectionनिवडणूकMarket Yardमार्केट यार्ड