शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भाववाढीने तूर लावणारे मालामाल, तर सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच

By रमेश वाबळे | Updated: February 1, 2024 18:12 IST

यंदा खरिपात पावसाचा लहरीपणा आणि किडींचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन, तूर, कापसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली.

हिंगोली : येथील मोंढ्यात तुरीने १० हजार ६०० रुपयांचा पल्ला पार केला असून, काही दिवसांत अकरा हजारांचा पल्ला गाठण्याची शक्यता आहे. तर सोयाबीनच्या भावात मात्र घसरण सुरूच आहे. १ फेब्रुवारी रोजी सोयाबीनला सरासरी केवळ ४ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.

यंदा खरिपात पावसाचा लहरीपणा आणि किडींचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन, तूर, कापसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली. जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या निम्म्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होता. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे पाहतात. परंतु, यंदा उत्पादनात घट झाली. त्यामुळे भाव तरी समाधानकारक मिळेल, अशी आशा होती. किमान सहा हजार रुपयांचा भाव अपेक्षित असताना सोयाबीनने पाच हजारांचाही पल्ला गाठला नाही. डिसेंबरमध्ये ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० दरम्यान भाव मिळत होता. भाव वाढतील, अशी अशा असताना घसरण झाली. मागील पंधरवड्यापासून सोयाबीनचे भाव गडगडले असून, १ फेब्रुवारी रोजी सरासरी केवळ ४ हजार २०० रुपयांपर्यंतच भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी पुढे येत होती.

तर तुरीला सध्या समाधानकारक भाव मिळत असला तरी यंदा उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी तूर उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. ज्या काही शेतकऱ्यांकडे तूर आहे, ते विक्रीसाठी आणत आहेत. परंतु, मोंढ्यात अपेक्षित आवक होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी मोंढ्यात दररोज किमान ५०० ते ६०० क्विंटल तूर विक्रीसाठी येते. यंदा मात्र ३०० क्विंटलवर आवक होत नसल्याचे चित्र आहे. सध्या मोंढ्यात तुरीला ९ हजार ९०० ते १० हजार ६०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. भाव समाधानकारक असला तरी उत्पादन घटल्याने विक्रीसाठी तूर नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गव्हाची आवक मंदावली...नवीन गहू येण्यासाठी आणखी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे जो काही गहू शिल्लक आहे. तो विक्रीसाठी येत आहे. परंतु, आवक मंदावली असून, गुरुवारी जवळपास ६० क्विंटल गहू विक्रीसाठी आला होता. १ हजार ६०० ते ३ हजार १५५ रुपये भाव मिळाला.

हळद वधारली...ऑक्टोबरपासून घसरलेले हळदीचे भाव मागील चार दिवसांपासून वधारत असल्याचे पाहावयास मिळत आहे. नोव्हेंबर, डिसेंबरदरम्यान ११ हजारांपर्यंत भाव घसरले होते. जानेवारीअखेर भावात वाढ झाली असून, ३१ जानेवारी रोजी एक हजार क्विंटलची आवक झाली होती. ११ हजार ५०० ते १४ हजार १०० रुपये भाव मिळाला. हळदीचे भाव वधारल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हरभऱ्याला मिळाला ५५०० चा भाव...येथील मोंढ्यात हरभऱ्याची आवक अत्यल्प आहे. त्यामुळे भावात किंचित वाढ झाली असून, ४ हजार ७०० ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. शेतकऱ्यांकडे नवीन हरभरा येण्यासाठी किमान एक महिना लागणार आहे. नवीन हरभऱ्यालाही समाधानकारक भाव मिळावा, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली