विविध कल्याणकारी योजनेच्या चित्ररथाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST2021-03-09T04:33:27+5:302021-03-09T04:33:27+5:30
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थींना व्हावी यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जाती ...

विविध कल्याणकारी योजनेच्या चित्ररथाचा प्रारंभ
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थींना व्हावी यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जाती व उपायोजनेअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या चित्ररथाचा जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजनांवर आधारित माहिती पुस्तिका, घडीपत्रिका, भित्तीपत्रिकांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, समाजकल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी आदींची उपस्थिती होती.
चित्ररथावर योजना माझ्यासाठी, सर्वांसाठी अंतर्गत मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम, माझी कन्या भाग्यश्री, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजन, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, दुधाळ जनावरांचे गटवाटप, शालेय शिक्षण विभाग तर योजना सामाजिक न्यायाच्या अंतर्गत रमाई आवास (घरकुल) योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड आदी योजनांसह कोरोना जनजागृतीची माहिती चित्ररथावर देण्यात आली होती. सदरील चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण भागात फिरणार असून, अनेक लाभार्थींना तसेच नागरिकांना याचा लाभ होणार आहे.