शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

'घरी येतोय', निरोप दिला अन् अवघ्या काही अंतरावर भाविकांवर काळाची झडप

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: July 29, 2023 1:39 PM

अमरनाथ यात्रेहून परणाऱ्या भाविकांच्या खासगी बसला मलकापूरात अपघात; सहाजण ठार

हिंगोली : २२ दिवसांपासून देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांना गावाची ओढ लागली होती. यात्रा प्रमुखांनी उद्या गावात पोहचणार असल्याचा निरोपही दिला. मात्र मलकापूर नजीक बसला अपघात झाला. यात्राप्रमुखासह सहा जण ठार झाले. उर्वरित जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल आहेत. यामुळे जिल्ह्यातून शेकडो जण आपल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. 

हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील शिवाजी धनाजी जगताप काही वर्षांपासून दरवर्षी खाजगी बसने अमरनाथ यात्रा काढायचे. यंदाही भांडेगाव, लोहगाव, जयपूर, डिग्रस कऱ्हाळे, साटंबा आदी गावातील भाविकांनी  यात्रेसाठी नोंदणी केली होती. जिल्ह्यातून जवळपास ४० जणांनी १० जुलै रोजी त्यांची धार्मिक यात्रा सुरू केली होती. शेगावमध्ये गजानन महाराजांचे प्रथम दर्शन घेतले होते. त्यानंतर मुक्ताईनगर, अमृतसर, वाघा बॉर्डर, ओंकारेश्वर, उज्जैन, मथुरा येथे जाऊन ते परतीच्या प्रवासासाठी निघाले होते. घरापासून जवळपास २०० कि.मी. अंतरावर मलकापूर शहरानजीक त्यांची बस आली होती. गावाकडे परत येत असल्याचा तसा नातेवाईकांना निरोपही होता. 

दरम्यान, आज पहाटे घरी पोहचणार तोच त्यांच्या खासगी बसला मलकापूर नजीक रेल्वे उड्डाणपूला जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नागपूर येथून नाशिककडे जाणाऱ्या एका खाजगी बसने समोरासमोर धडक दिली. या अपघातात खासगी प्रवाशी बस अक्षरश: चालकाच्या बाजूने चिरत गेली. यात ६ भाविक ठार झाले असून जवळपास २० जण जखमी झाले आहेत. यातील पाच जण गंभीर जखमी आहेत. दरम्यान, भाविक देवदर्शनाहून काही वेळातच घरी परतणार तोच नातेवाईकांना भल्या पहाटे अपघाताची माहिती मिळाली. ही घटना समजताच नातेवाईकांनी घटनास्थळ गाठले. ही वार्ता जिल्हाभरत पसरताच हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अपघातामधील मृतांची नावेया अपघातामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सहा जण ठार झाले. यात बसचालक संतोष आनंदराव जगताप (रा. भांडेगाव), राधाबाई सखाराम गाडे (रा. जयपूर), अर्चना गोपाल घुकसे,  सचिन शिवाजी महाडे (दोघेही रा. लोहगाव), शिवाजी धनाजी जगताप (रा. भांडेगाव)  कानोपात्रा गणेश टेकाळे (रा.सिंदगीनागा) यांचा समावेश आहे. कानोपात्रा टेकाळे यांना गंभीर अवस्थेत बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयत हलविण्यात आले असता  त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. 

जखमींची नावे अशी- बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघातामधील जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. यात  मेनका विष्णु खुळे (३०, रा. लोहगाव), द्वारकाबाई गजानन रोडगे (३०, रा. जामरून), महादेव संभा रणबळे (५०, रा. खंडाळा), गंगाराम गीते (६३, रा. सिंदगीनागा), संतोष भिकाजी जगताप (५४, रा. भांडेगाव), भगवान नारायन गिते (४८, रा. सिंदगीनागा), राधा नाथा घुकसे (३२, रा. लोहगाव), लिलाबाई एकनाथ आसोले (३३, रा. काळेगाव), पार्वती काशिनाथ ठोकळे (६०, सेनगाव), बद्रीनाथ संभाजी कऱ्हाळे (५४, रा. डिग्रस कऱ्हाळे), गिरीजाबाई बद्रीनाथ कऱ्हाळे (५०, रा. डिग्रस कऱ्हाळे), बेबीताई कऱ्हाळे (५०, रा. डिग्रस कऱ्हाळे), हनुमंत संभाजी फाळके (२६, जयपूर), काशीराम महाजी गिते (४०, रा. सेनगाव), भागवत पुंजाजी फाळके (२८, रा. जयपूर वाडी), किसन नामाजी फसाटे (६०, रा. सिंदगीनाका), गणेश शिवाजी जगताप (३८, रा. भांडेगाव), उमाकांत महादजी येवले (३९, रा. शिवनी, ता. सेनगाव) यांचा समावेश आहे. जखमीपैकी बेबीबाई बद्रीनाथ कऱ्हाळे आणि गिरजाबाई बद्रीनाथ कऱ्हाळे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोलीAmarnath Yatraअमरनाथ यात्रा