संचारबंदीत दुकाने बंद; वर्दळ मात्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST2021-03-06T04:28:47+5:302021-03-06T04:28:47+5:30

५ मार्च रोजी तर विभागीय आयुक्त येणार असल्याने इंदिरा गांधी चौक परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. या भागातून कुणालाही फिरकू ...

Closed shops closed; The hustle and bustle just started | संचारबंदीत दुकाने बंद; वर्दळ मात्र सुरू

संचारबंदीत दुकाने बंद; वर्दळ मात्र सुरू

५ मार्च रोजी तर विभागीय आयुक्त येणार असल्याने इंदिरा गांधी चौक परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. या भागातून कुणालाही फिरकू दिले जात नव्हते. इतर मार्ग मात्र मोकळेच होते. या भागात पोलीस किंवा कुणीही नियंत्रणासाठी नसल्याने बाजारपेठ सुरू झाल्याप्रमाणे रस्त्यांवरून वर्दळ सुरू असल्याचे दिसत होते. याबाबत पोलिसांना विचारणा केली तर लसीकरण, बँका, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, माल घेऊन आलेला शेतकरी आहे आदी कारणे सांगून लोक फिरत आहेत. मात्र त्यात या बाबींना सूट असल्याने काहीच करता येत नसल्याची हतबलता त्यांनी व्यक्त केली. दुपारपर्यंत काही भागात वर्दळ वाढल्याचा परिणाम म्हणून अनेकांकडून विचारणा होत असल्याने पोलिसांनी काही जणांना प्रसादही दिला. मात्र तरीही नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत होते. संचारबंदीत केवळ दुकानेच बंद राहात असून, इतर सर्व बाबींचे व्यवहार करण्यासाठी नागरिक कायम घराबाहेर पडत असल्याने यात प्रशासनाने कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा या संचारबंदीत शिथिलता देऊन नागरिकांनी कोरोनाविषयक नियम न पाळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा पवित्रा स्वीकारणे सोयीचे ठरणार आहे.

Web Title: Closed shops closed; The hustle and bustle just started