मोरवाडीजवळ दोन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:08 IST2018-07-29T23:07:02+5:302018-07-29T23:08:36+5:30
हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर मोरवाडी जवळ किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २८ जुलै रोजी रात्री १० वाजता घडली. यात तीन जण जखमी झाले आहेत.

मोरवाडीजवळ दोन गटांत हाणामारी
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर मोरवाडी जवळ किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २८ जुलै रोजी रात्री १० वाजता घडली. यात तीन जण जखमी झाले आहेत.
लोखंडी पाईपने एकमेंकांना मारहाण झाल्यामुळे शेख फारुक, बालाजी भोरे, संजय खडके हे तीन जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी माहिती मिळताच पोनि जी.एस.राहिरे फौजदार घेवार व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली व जखमींना ग्रामीण रुग्णालयात व नंतर हिंगोलीच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहिल्या फिर्यादीत वैभव ठोबरे यांच्या फिर्यादीवरून शेख शब्बू, शेख जम्मू, शेख आसेफ, शेख फारुक यांच्याविरूद्ध कलम ३२४, ३२३, ५०९, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीतांनी मोटारसायकल गणेश गुव्हाडे यांच्या अंगावर घातली. मोटारसायकल अंगावर का घातली असे विचारले असता आरोपीतांनी फिर्यादीसोबत वाद घालून शेख शब्बु याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने संजय खडकेव बालाजी मोरे यांच्या डोक्यात मारून डोके फोडले व इतर आरोपीतांनी शिवीगाळ करून थापडबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. दुसºया फिर्यादीत शेख शब्बू यांच्या फिर्यादीवरूनगणेश गुव्हाडे, संजय खटके, शंकर आमले रा. मोरवाडी यांच्या विरुद्ध कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी हा मोटार सायकल घेवून जात असताना गणेश गुव्हाडे हा अचानक फिर्यादीच्या मोटार सायकल समोर आल्याने त्यातून वाद होवून आरोपींनी संगणमत करून संजय खटके याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने सय्यद फारुक यांच्या डोक्यात मारून दुखापत केली व साक्षीदारास शिवीगाळ करून थापडबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोहेका अली हे करीत आहेत.