इस्माईल जहागिरदार, वसमत (जि. हिंगोली) : शहरातील पूर्णा सहकारी साखर कारखाना मार्गावरील जवाहर कॉलनी भागातील एका हॉटेलमधून बाहेर पडताना दोन गटात वाद झाला. या वादातून चाकू, खंजीर, फरशीचे तुकडे याचा वापर करत मारहाण झाली. या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले असून जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारच्या मध्यरात्री घडली.
वसमत शहरातील जवाहर कॉलनी भागात १६ ऑगस्ट शनिवार रोजी रात्री १२.१० वा दरम्यानात एका हॉटेल मध्युन बाहेर पडताना हॉटेल च्या गेट मध्ये उभे आसलेल्या चौघांना बाजुला व्हा आसे म्हणताच दोन गटात वाद झाला. यावादात अर्शद कुरेशी,रेहान कुरेशी,सय्यद रिजवान यांना चाकु,खंजिर व फरशिच्या तुकड्याने मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला,घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे,शहर पोलीस ठाण्याचे सुधीर वाघ, फौजदार कसबेवाड,अजय पंडित, इम्रान कादरी, गजानन भोपे यांच्या सह आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन प्ररस्थितीवर नियंत्रण आणले.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री १.३० वा सुमारास अर्शद कुरेशी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरुन असिम कुरेशी,शे अल्ताफ,शेख शहरुख,वसिम बागवान ( चौघे रा वसमत),शेख वसिम (रा चौंडी) यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,याप्रकरणाचा तपास शहर पोलीस करत आहेत.