दहावीत ९९ टक्के मिळालेल्या विद्यार्थ्याचा हिटरचा शॉक लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 01:31 PM2020-03-09T13:31:42+5:302020-03-09T14:09:35+5:30

११ वीची परीक्षा देऊन तो १ मार्च रोजी शिरडशहापूर गावाकडे आला होता.

a child killed in electric shock who got 99 percentage in tenth grade | दहावीत ९९ टक्के मिळालेल्या विद्यार्थ्याचा हिटरचा शॉक लागून मृत्यू

दहावीत ९९ टक्के मिळालेल्या विद्यार्थ्याचा हिटरचा शॉक लागून मृत्यू

Next
ठळक मुद्देहिटरमधून पाणी घेताना विजेचा धक्का लागून झाला मृत्यू

शिरडशहापूर (जि.हिंगोली) : अंघोळ करण्यासाठी हिटरमधून पाणी घेत असताना विजेचा धक्का लागून एका १६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता शिरडशहापूर येथे घडली. जय ज्योती जाधव असे मृत बालकाचे नाव आहे. 

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील जय जाधव या विद्यार्थ्याचे पाचवी ते दहावीचे शिक्षण रिसोड येथील भावना पब्लिक स्कुलमध्ये झाले. त्याने दहावी परिक्षेत ९९.०६ टक्के गुण मिळविले होते. पुढील शिक्षणासाठी तो राजस्थान येथील आयलेन संग्यज्ञ (कोटा) येथे ११ वी सायन्समध्ये होता. ११ वीची परीक्षा देऊन तो १ मार्च रोजी शिरडशहापूर गावाकडे आला होता. तो आईला एकुलता एक मुलगा होता. त्याने आय.एस.अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते; परंतु त्याचे सोमवारी दुर्देवी निधन झाले. 

घटनेची माहिती मिळताच जमादार प्रकाश नेव्हल यांनी प्रेताचा पंचनामा केला व शवविच्छेदन वसमत येथील ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले. कुरूंदा पोलीस ठाण्यात आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: a child killed in electric shock who got 99 percentage in tenth grade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.