बालके दत्तक देण्याचे संदेश चुकीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST2021-05-07T04:31:28+5:302021-05-07T04:31:28+5:30
जिल्ह्यात असे प्रकार घडू नयेत याकरिता महिला व बाल विकास आयुक्तालय आणि सेव्ह द चिल्ड्रन (इंडिया) या दोघांच्या संयुक्त ...

बालके दत्तक देण्याचे संदेश चुकीचे
जिल्ह्यात असे प्रकार घडू नयेत याकरिता महिला व बाल विकास आयुक्तालय आणि सेव्ह द चिल्ड्रन (इंडिया) या दोघांच्या संयुक्त विद्यमाने मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. या मदत कक्षास संपर्क करण्यासाठी ८३०८९९२२२२ आणि ७४०००१५५१८ या मोबाईल क्रमाकांवर सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत संपर्क साधावा.
अशाप्रकारे कोरोना अथवा इतर कोणत्याही कारणामुळे पालकांचा मृत्यू झाला असेल आणि बालकास कोणीही नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा बालकांसाठी उपरोक्त नमूद हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून माहिती द्यावी. वरील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच बालकांसाठी यापूर्वी सुरू असलेली हेल्पलाईनही उपलब्ध असल्याचे सहायक आयुक्त महिला व बाल विकास विभाग, तथा कार्यक्रम व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था पुणे यांनी कळविले आहे.