सेनगाव येथून मुलाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST2021-03-19T04:28:40+5:302021-03-19T04:28:40+5:30

प्रल्हाद पतिंगराव तिडके (रा. अप्पास्वामी गल्ली, सेनगाव) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. सेनगाव येथून त्यांचा मुलगा राजू प्रल्हाद तिडके ...

Child abduction from Sengaon | सेनगाव येथून मुलाचे अपहरण

सेनगाव येथून मुलाचे अपहरण

प्रल्हाद पतिंगराव तिडके (रा. अप्पास्वामी गल्ली, सेनगाव) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. सेनगाव येथून त्यांचा मुलगा राजू प्रल्हाद तिडके याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नाईक हे करीत आहेत.

लॉटरी अड्ड्यावर पोलिसांचा छापा

सेनगाव : तालुक्यातील जयपूर येथे लॉटरी खेळून लोकांकडून पैसे घेणाऱ्या पाच जणांवर सेनगाव पोलिसांनी कारवाई करीत मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १७ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली. जयपूर येथे लॉटरी खेळ खेळवित लोकांकडून पैसे घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी लॉटरी घरावर छापा टाकून रामेश्वर पायघन (लॉटरीचालक), भागवत पोपळघट, लक्ष्मण ढोले, संतोष पायघन, गणेश पायघन (सर्व रा. जयपूर) यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून एक हजार ८७० रुपये रोख व ५७ हजार २०० रुपये किमतीचे लॉटरीचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलीस हवालदार पंजाब लेकुळे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल माघाडे करीत आहेत.

किरकोळ कारणावरून मारहाण

सेनगाव : तालुक्यातील कवठा येथे किरकोळ कारणावरून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. कवठा येथील अरुणा दीपक खंदारे यांना ज्ञानेश्वर अंभोरे, संदीप गायकवाड यांनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच हा वाद सोडविण्यासाठी आलेल्या एकासही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अरुणा खंदारे यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल माघाडे तपास करीत आहेत.

Web Title: Child abduction from Sengaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.