शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर १२ हजार पथदिव्यांनी उजाळणार; पुढील चार महिन्यांत होणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 16:13 IST

सातारा परिसरात आठ वर्षांनंतर ७,५५० अन् शहरात ४,५०० नवीन पथदिवे लावणार

छत्रपती संभाजीनगर : सातारा-देवळाईचे मनपाकडे हस्तांतरणास ८ वर्षे झाल्यानंतर पहिल्यांदाच महापालिका या भागात पथदिवे लावणार आहे. या भागात ७,५०० तर उर्वरित शहरात ४,५०० नवीन पथदिवे लावण्याचे आदेश प्रशासक जी.श्रीकांत यांनी विद्युत विभागाला दिले. ३१ मार्च, २०२४ पर्यंत हे काम पूर्ण झाले पाहिजे, अशी डेडलाइनही त्यांनी दिली.

स्मार्ट सिटी कार्यालयात प्रशासकांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. बैठकीत पथदिव्यांचा मुद्दा चर्चेला आला. नवीन वसाहतींमध्ये पथदिवे लावावेत, अशी सातत्याने मागणी होत असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. प्रशासक स्वत: जेव्हा विविध वसाहतींमध्ये पाहणीसाठी जातात, तेव्हाही नागरिक पथदिव्यांचा मुद्दा उपस्थित करतात. ज्या भागात पथदिवे लावलेले नाहीत, अशा भागात पथदिवे लावावेत. सातारा-देवळाई येथे नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. ड्रेनेजलाइनच्या कामाला सुरुवात झाली. बहुतांश रस्त्यांवर पथदिवे नाहीत. त्यामुळे नागरिकांना रात्री अडचणींचा सामना करावा लागत आहे. पथदिवे लावण्यासाठी विद्युत विभागाने योग्य नियोजन करावे. सातारा-देवळाई भागात ७,५०० तर नो नेटवर्क भागातही ४,५०० पथदिवे लावावेत. शहर प्रकाशमय करण्याच्या दृष्टीने १२ हजार पथदिवे लावण्यासाठी प्रशासकांनी मान्यता दिली.

६० हजार पथदिवे आतापर्यंतशहरात ४० हजार पथदिवे असावेत,असे गृहीत धरून दिल्लीच्या इलेक्ट्रॉन कंपनीला एलईडी दिवे लावण्याचे काम दिले. दहा वर्षांसाठी हे काम दिले. कंपनीने ४० हजारांचा टप्पा पूर्ण केल्यावर अनेक भागांत जुनेच चायनामेड दिवे होते. त्यामुळे २० हजार आणखी दिवे लावले. कंपनीने यासाठी अतिरिक्त पैसे घेतले नाहीत. एलईडी पथदिव्यांमुळे दरमहा सव्वाकोटी रुपयांचे विद्युत बिल कमी येत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका