लोकमत न्यूज नेटवर्कनर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव जवळील हळदवाडी या गावाला रस्ताच नसल्याने चेअरमन दिगंबर गुगळे यांची ३१ आॅगस्ट रोजी तबेत बिघडली. त्यांना दवाखान्यात नेण्यास उशीर झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.शासनाकडून गाव तिथे रस्ता हा उपक्रमही राबविला; परंतु हिंगोली तालुक्यातील नर्सी ग्रामपंचायतचा वार्ड क्र. १ मध्ये असलेली हळदवाडीचा रस्ता तयार झालाच नाही. ग्रामस्थांना चिखलाचा रस्ता, काटेरी रस्त्यावरून मार्गक्रम करावे लागते. रात्री अपरात्री प्रकृती खराब झाली तर त्यास बैलगाडी शिवाय पर्याय नसतो. आतापर्यंत या गावातून अनेकदा ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी, शासन दरबारी रस्त्याची मागणी केली; परंतु याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. चेअरमन दिगंबर राजाराम गुगळे (रा. हळदवाडी) यांना शुक्रवारी ३१ रात्री अचानक अस्वस्थ वाटत असल्याचे नातेवाईक सांगत होते. नातेवाईकांनी दवाखान्यात नेण्याची तयारी केली; परंतु रस्ता चिखलाचा असल्याने दवाखान्यात नेण्यास उशीर झाला. त्यामुळेच त्यांचा प्राण गेल्याचे ग्रामस्थांतून सांगितली जात होते. त्यामुळे शासनाने दखल घेत आता तरी रस्ता करावा अशी मागणी आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने चेअरमनचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 01:29 IST