वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST2021-02-05T07:55:10+5:302021-02-05T07:55:10+5:30

जिल्ह्यात वाळूची होत असलेली चोरटी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या ...

Caught two tractors transporting sand smugglers | वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

जिल्ह्यात वाळूची होत असलेली चोरटी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या सूचनेवरून कारवाई केली जात आहे. ३ फेब्रुवारी रोजी दोन ट्रॅक्टर वाळूची चोरटी वाहतूक करीत असल्याची माहिती स्थागुशा पथकाला मिळाली होती. त्यावरून या पथकाने तालुक्यातील बाेराळा ते पांगरी रोडवर पाहणी केली असता ट्रकचालक बंडू शंकर कामखेडे, हनुमान बबन कामखेडे (दोघे, रा. आमला) हे वाळूची वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. पथकाने १० हजार रुपये किमतीची दोन ब्रॉस वाळू तसेच ११ लाख ४० हजार रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, बालाजी बोके, संभाजी लेकुळे, भगवान आडे, सुनील अंभोरे, शंकर ठोंबरे, राजू ठाकूर, किशोर सावंत, दीपक पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Caught two tractors transporting sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.