खून प्रकरणात तपासाला मिळेना दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:22 IST2018-07-08T23:22:36+5:302018-07-08T23:22:50+5:30
तालुक्यातील आजेगाव येथील नागझरी महादेव मंदिराचे पुजारी बंडू महाराज सौदागर यांच्या खून प्रकरणात पोलीस तपासात पाच दिवसानंतरही ठोस पुरावे हाती लागले नसल्याने पोलीस तपास योग्य दिशा मिळत नसल्याने पुढे सरकायला तयार नाही.

खून प्रकरणात तपासाला मिळेना दिशा
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील आजेगाव येथील नागझरी महादेव मंदिराचे पुजारी बंडू महाराज सौदागर यांच्या खून प्रकरणात पोलीस तपासात पाच दिवसानंतरही ठोस पुरावे हाती लागले नसल्याने पोलीस तपास योग्य दिशा मिळत नसल्याने पुढे सरकायला तयार नाही.
आजेगाव येथे गावापासून दिड किमी अंतरावर असलेल्या नागझरी महादेव मंदिराचे पुजारी बंडू महाराज सौदागर (४०) यांच्यावर ३ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मंदिरातच अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना घडली होती. घटनेत बंडू महाराज यांच्यावर आरोपी ने वार केल्याने रक्त स्त्राव होवून उपचारापूर्वी पुजारी सौदागर यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. क्रुरपणे झालेल्या खून प्रकरणात पोलिसांच्या प्राथमिक तपासात अज्ञात मारेकरी एकटाच होता. या वेळी मयत बंडू महाराज यांच्या समवेत घटनास्थळी असलेल्या दोघांच्या जवाबानुसार मारेकऱ्याने महाराजावर केलेल्या हल्ल्या नंतर आरोपी अत्यंत शांंतपणे मोटारसायकलवर बसून सेनगावच्या दिशेने निघुन गेला. या घटनेला जवळपास पाच दिवसाचा कालावधी उलटला असून पोलीस तपासात खूनाचा उलगडा होईल अशी ठोस दिशा पोलीसांना अद्यापपंर्यत मिळाली नाही. अजूनही पोलीस तपास खूनाची कारणे, संशयास्पद बाबीचा शोध घेत आहेत. मयत नातेवाईकांचा जवाब,परिसरातील घटनेच्या दिवसाचे मोबाईल लोकेशन डाटा, या सह तपासाचा दृष्टिकोनातून आवश्यक सर्व बाबींची पडताळणी पोलीस करीत असल्याचे सपोनि माधव कोरंटलू यांनी दिली.