कारच्या काचा फोडल्या; इसमावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:35 IST2018-04-20T00:35:04+5:302018-04-20T00:35:04+5:30

चारचाकी वाहनाने हिंगोलीकडे येत असताना औंढा-हिंगोली मुख्य रस्त्यावरील संतुकपिंपरी येथे वाहन येताच एका इसमाने कारच्या काचा फोडल्याची घटना १८ एप्रिल रोजी घडली.

 Car broke; Filed a crime | कारच्या काचा फोडल्या; इसमावर गुन्हा दाखल

कारच्या काचा फोडल्या; इसमावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : चारचाकी वाहनाने हिंगोलीकडे येत असताना औंढा-हिंगोली मुख्य रस्त्यावरील संतुकपिंपरी येथे वाहन येताच एका इसमाने कारच्या काचा फोडल्याची घटना १८ एप्रिल रोजी घडली.
बालासाहेब बाबुराव पोले हे हिंगोली-औंढा मुख्य रस्त्यावरून वाहनाने येत होते.
यावेळी संतुकपिंपरी परिसरात वाहन येताच महेंद्र दत्तराव दिपके याने वाहनावर दगड फेकून काचा फोडल्या. यात कारचे नुकसान झाले. यात चालक पोले व कारमधील संतोष वºहाडे जखमी झाले. याप्रकरणी बालासाहेब पोले यांच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण ठाण्यात महेंद्र दिपके याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना जी. के. पोकळे करीत आहेत.

 

Web Title:  Car broke; Filed a crime