हळदीच्या पिकात गांजा लागवड; १०० किलोच्यावर गांजाची झाडे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 17:48 IST2021-12-01T17:47:50+5:302021-12-01T17:48:10+5:30
वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गुंडा शिवारात लागवड.

हळदीच्या पिकात गांजा लागवड; १०० किलोच्यावर गांजाची झाडे जप्त
वसमत : हट्टा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गुंडा शिवारातील हळदीच्या पिकात असलेल्या गांजाची झाडे पोलिसांनी कारवाई करून ताब्यात घेतली आहेत. गांजाची झाडे १०० किलोच्या वर असल्याचा अंदाज कार्यवाही दरम्यान महसूलच्या पथकाने दिला आहे.
वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गुंडा शिवारातील शेतकरी उत्तम भालेराव यांच्या शेत गट क्रमांक ४१६ व ४२७ मधील हळदीच्या पिकात गांजाची झाडे लावण्यात आल्याची गुप्त माहिती पाेलिसांना मिळाली. यावरून १ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन मोरे, फौजदार सतिश तावडे, सोनटक्के, मंडळ अधिकारी खोकले, तलाठी राऊत यांनी शेतात जात, कारवाई केली. हळदीच्या पिकात लावलेली गांजाची झाडे ताब्यात घेतली आहेत. ही झाडे जवळपास १०० किलोच्यावर असल्याचा अंदाज महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.