शिवसंपर्क अभियानात कोरोनामुक्तीची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST2021-07-17T04:23:58+5:302021-07-17T04:23:58+5:30

हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे, भांडेगाव येथे शिवसेनेच्या वतीने यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. यात जिल्हा समन्वयक दिलीप बांगर यांनी ...

Call for coronation in Shiv Sampark Abhiyan | शिवसंपर्क अभियानात कोरोनामुक्तीची हाक

शिवसंपर्क अभियानात कोरोनामुक्तीची हाक

हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे, भांडेगाव येथे शिवसेनेच्या वतीने यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. यात जिल्हा समन्वयक दिलीप बांगर यांनी मार्गदर्शन केले. माजी जि. प. उपाध्यक्ष उद्धव गायकवाड, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, तालुकाप्रमुख भानुदास जाधव, रमेश शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेची पूजा करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.

यावेळी बांगर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिश्रमाने महाराष्ट्र आज कोरोनावर मात करीत आहे. मात्र यापुढे डेल्टा प्लस, झिका असे इतर विषाणूंची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक गावात माझे गाव, कोरोनामुक्त गाव ही संकल्पना रुजण्यासाठी आवश्यक उपायांची काळजी घेतली पाहिजे. सेनेच्या शाखा प्रमुखांनी यात मेहनत घ्यावी. हा कार्यक्रम जिल्हाभर चालू राहणार आहे. शिवसैनिकांनी आपापल्या भागात जनजागृती करून सर्व योजना ग्रामीण भागापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत कशा पोहोचतील याकरिता प्रयत्न करावेत, असे आवाहनही करण्यात आले.

Web Title: Call for coronation in Shiv Sampark Abhiyan