शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

खासगी डॉक्टरांचे रुग्ण ॲंटीजेन तपासणीसाठी बसस्थानकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST

हिंगोली : शहरातील काही खासगी डॉक्टर त्यांच्याकडे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना रॅपिड ॲंटीजेन तपासणीसाठी बसस्थानकातील आरोग्य पथकाकडे पाठवित आहेत. त्यामुळे ...

हिंगोली : शहरातील काही खासगी डॉक्टर त्यांच्याकडे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना रॅपिड ॲंटीजेन तपासणीसाठी बसस्थानकातील आरोग्य पथकाकडे पाठवित आहेत. त्यामुळे प्रवाशांची ॲंटीजेन तपासणी करताना अडथळा निर्माण होत असून खासगी डॉक्टरांनी पाठविलेल्या रुग्णांसोबत वादाचे प्रकार घडत आहेत. या प्रकारामुळे आरोग्य पथकातील कर्मचारी वैतागले आहेत.

जिल्ह्यात कोरोना आजाराने पाय फैलावयास सुरुवात केली आहे. रुग्ण संख्या वाढत असून जिल्हा प्रशासनही विविध उपाययोजना करीत आहे. बाहेर गावाहून, जिल्ह्यातून हिंगोलीत येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यासाठी प्रत्येक बसस्थानकावर आरोग्य पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, एसटी महामंडळाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हिंगोलीत उतरणाऱ्या प्रवाशांना अगोदर रॅपीड ॲंटीजेन तपासणी करावी लागत आहे. प्रवाशांची तपासणी केल्यानंतर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य पथक दिवसभर व्यस्त असते. बसस्थानकात रॅपीड ॲंटीजेन तपासणी केली जात असल्याने याची संधी खासगी डॉक्टरही उचलत आहेत. खासगी डॉक्टरांकडे आलेल्या रुग्णाला ॲंटीजेन तपासणी करून घेण्याचा सल्ला देत बसस्थानकात पाठविले जात आहे. खासगी डॉक्टरांकडील रुग्णांची तपासणी करताना अनेक वेळा आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना वादाला सामोरे जावे लागत आहे. वाद विकोपाला जात असल्याने या ठिकाणी पोलीस कर्मचारी नियुक्त करावा, अशी मागणी आरोग्य पथकातील सदस्यांनी केली आहे.

रविवारी ७ रुग्ण पॉझिटिव्ह

हिंगोली बसस्थानकात रविवारी दुपारपर्यंत २१ प्रवाशांची ॲंटीजेन तपासणी केली असता त्यातील ७ प्रवासी पॉझिटिव्ह निघाले आहेत. या प्रवाशांना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या पथकात डॉ. नावेद अतहर, सय्यद इम्रान अली, आर. टी. भोसीर, प्रवीण भालेराव, सुधा सपकाळ, अनिता खंदारे, मुकेश ठोंबरे, अजय मंदाडे आदींचा समावेश आहे.

फोटो : १४