गोदावरी पात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; गंगाखेड तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 18:32 IST2020-11-18T18:15:57+5:302020-11-18T18:32:31+5:30
गंगाखेड-परभणी रस्त्यावर खळी पाटी येथील गोदावरी पात्रात आढळला मृतदेह

गोदावरी पात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; गंगाखेड तालुक्यातील घटना
गंगाखेड : खळी फाटा येथील गोदावरी पात्रात मासेमारी करणाऱ्यांना पाण्यात एक मृतदेह तरंगताना आढळून आल्याची घटना बुधवारी ( दि. १८ ) दुपारी २.३० वाजता घडली. मृताची ओळख पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड-परभणी रस्त्यावर खळी पाटी येथील गोदावरी पात्रात काहीजण मासेमारी करतात. बुधवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास मासेमारी करत आसताना पाण्यात एका पुरुषाचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. पोलीस पाटील संगीता लक्ष्मणराव कचरे यांनी तत्काळ पोलिसांनी ही माहिती दिली. यानंतर पोलीस जमादार हरिभाऊ शिंदे, पो.ना. दत्तराव पडोळे यांनी घटनास्थळी धाव पाहणी केली. पोलिसांनी त्र्यंबक नामदेव कचरे यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृताच्या अंगावर काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, लाल रंगाचा शर्ट असून वय अंदाजे ३५ वर्ष असेल अशी माहिती पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी दिली आहे.