बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला कालव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:28 IST2020-12-22T04:28:11+5:302020-12-22T04:28:11+5:30
गुंडा येथील राजकुमार आबासाहेब चव्हाण हे जवळा बाजार येथून १९ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गावाकडे निघाले हाेते मात्र ...

बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला कालव्यात
गुंडा येथील राजकुमार आबासाहेब चव्हाण हे जवळा बाजार येथून १९ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गावाकडे निघाले हाेते मात्र घरी परतले नव्हते. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र सापडले नाहीत. यामुळे हट्टा पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली. त्यांची मोटरसायकल रविवारी जवळा बाजार येथील सतरा मैल परिसरात आढळून आली. त्यामुळे कालव्या परिसरात पाहणी केली. सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह कालव्यात आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. कारण ते अनेक दिवसांपासून आर्थिक विवेचंनेत असल्याचे नातेवाईकडून सांगण्यात आले आहे. जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केद्रात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत हट्टा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती. फाेटाे नं.