बेपत्ता मुलीचा नऊ दिवसानंतर आढळला विहिरीत मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 15:20 IST2021-03-02T15:19:38+5:302021-03-02T15:20:19+5:30

आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामठा फाटा येथे राजस्थान येथून आलेली रेश्मा गुड्डू शाह ही नऊ वर्षीय मुलगी 22 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाली होती.

The body of the missing girl was found nine days later in a well | बेपत्ता मुलीचा नऊ दिवसानंतर आढळला विहिरीत मृतदेह

बेपत्ता मुलीचा नऊ दिवसानंतर आढळला विहिरीत मृतदेह

आखाडा बाळापुर ( हिंगोली ) : कामठा फाटा येथून बेपत्ता झालेल्या नऊ वर्षाच्या मुलीचे मृतदेह ९ दिवसानंतर मंगळवारी ( दि. २) सकाळी  33 के.व्ही. उपकेंद्राच्या मागच्या भागातील एका विहिरीत आढळला आहे. रेश्मा गुड्डू शाह असे मृत मुलीचे नाव असून ती राजस्थान येथून आली होती. पोलीस तिच्या मृत्युच्या कारणांचा शोध घेत आहेत. 

आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामठा फाटा येथे राजस्थान येथून आलेली रेश्मा गुड्डू शाह ही नऊ वर्षीय मुलगी 22 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाली होती. तिच्या आईच्या तक्रारीवरून बाळापुर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी पोलिस पथकांसह तिचा चौफेर शोध घेतला. परंतु ती आढळली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी तर कामठा फाटा येथे दोन दिवस तळ ठोकला होता. 

पोलिसांची तीन पथके तिच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती .परंतु तीचा शोध लागला नव्हता. आज सकाळी  33 के.व्ही. उपकेंद्राच्या मागच्या भागात शेतकऱ्यांना दुर्गंधी येत होती. त्यांनी तेथील विहिरीत पहिले असता एका मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांनी माहिती मिळताच ठाणेदार रवी हुंडेकर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस तिच्या मृत्युच्या कारणाचा शोध घेत असून पुढील तपास सुरु आहे. 
 

Web Title: The body of the missing girl was found nine days later in a well