विहिरीत आढळला विवाहितेचा मृतदेह; औंढा नागनाथ येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 19:44 IST2018-07-02T19:43:37+5:302018-07-02T19:44:26+5:30

औंढा नागनाथ तालुक्यातील कोंडशी शिवारातील विहिरीत एका विवाहितेचा मृतदेह आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास आढळून आला. 

The body of a married man found in the well; The incident in Aunda Nagnath | विहिरीत आढळला विवाहितेचा मृतदेह; औंढा नागनाथ येथील घटना 

विहिरीत आढळला विवाहितेचा मृतदेह; औंढा नागनाथ येथील घटना 

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील कोंडशी शिवारातील विहिरीत एका विवाहितेचा मृतदेह आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास आढळून आला. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, आज दुपारी कोंडशी शिवारातील विहिरीत एका विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोउपनि ज्ञानोबा मुलगी, जमादार सचिन शिंदे, अरविंद गजभार, आंबादास विभुते आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला. मृत महिलेची ओळख पटली असून सोनाली गजानन घुगे (२२) असे विवाहितेचे नाव आहे. जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Web Title: The body of a married man found in the well; The incident in Aunda Nagnath