शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

रक्तसाठा मुबलक, तरीही...रुग्णांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 1:13 AM

काही महिन्यांपूर्वी टेस्टिंगसाठी लागणारी किट उपलब्ध नसल्यामुळेही विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या. सध्या किटचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती रक्तपेढीतून देण्यात आली.

ठळक मुद्देहिंगोली रूग्णालयात दिवसाकाठी जवळपास २० ते २५ रक्तपिशव्यांची आवश्यकता

हिंगोली : जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तपेढीत रक्तसाठा सध्या मुबलक प्रमाणात आहे. मात्र रक्ताला मागणी जास्त असलेल्या रक्तगटातीलच साठा रक्तपेढीत अल्पप्रमाणात आहे. शिवाय काही महिन्यांपूर्वी टेस्टिंगसाठी लागणारी किट उपलब्ध नसल्यामुळेही विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या. सध्या किटचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती रक्तपेढीतून देण्यात आली.

रक्तदात्यांना आवाहनजिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत सध्या ‘ए’ पोझीटीव्ह, ‘बी’ पोझीटीव्ह व ‘एबी’ पॉझिटिव्ह या रक्तगटातील रूग्णांना रक्त जास्त प्रमाणात लागत आहे. त्यामुळे या रक्तगटातील दात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन जिल्हा रूग्णालय रक्तपेढीतर्फे करण्यात आले आहे. ज्यामुळे रूग्णांची गैरसोय होणार नाही, शिवाय त्यांच्या नातेवाईकांची धावपळही होणार नाही.

 

जिल्हा रूग्णालयात दिवसाकाठी जवळपास २० ते २५ गरजू रूग्णांना रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. मात्र ज्या गटातील रक्ताला जास्त मागणी आहे, त्याच गटातील रक्तसंकलन कमी आहे. त्यामुळे ऐनवेळी रूग्णांनाची धावपळ होताना दिसून येत आहे. ‘ए’ पॉझिटिव्ह, ‘बी’ पॉझिटिव्ह व ‘एबी’ पॉझिटिव्ह या रक्तगटातील रूग्णांना रक्त जास्त प्रमाणात लागत आहे. परंतु या गटातील रक्तसंकलन कमी आहे. त्यामुळे मुबलक प्रमाणात रक्तसाठा असूनही तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे.सध्या जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत ‘ए’ पॉझिटिव्हच्या १७ रक्तबॅग उपलब्ध आहेत. तर बी पोझीटीव्ह १४, ‘एबी’ पोझीटीव्ह रक्तगटाच्या ३ तर सर्वात जास्त ‘ओ’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या ३३ पिशव्या रक्तपेढीत उपलब्ध आहेत. जानेवारी ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत एकूण ३०३८ रक्तदान शिबिरातून ३४६३ रक्त पिशव्यांचे संकलन झाले होते.शिवाय शासकीय रक्तपेढीतून खाजगी रूग्णालयातील रूग्णांसाठीही टोल क्रमांक १०४ द्वारे रक्तपिशव्यांचा पुरठा केला जातो.रक्तपेढीतील प्रत्येक बॅगच्या नोंदी ठेवल्या जातात...जिल्हा सामान्य रूग्ण्यालयातील रक्तपेढीतून परस्पर बॅग दिल्या जात असल्याच्या काही रूग्णांच्या नातेवाईकांतून तोंडी तक्रारी आहेत. तशा तक्रारी असतील तर थेट अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी लोकमतशी बोलताना केले. परंतु असा काही प्रकार होत नसल्याचे रक्तपेढीतील संबंधित कर्मचाºयांनी सांगितले. शिवाय रक्तदान शिबिरातून प्राप्त झालेल्या प्रत्येक रक्त पिशव्यांच्या नोंदी या विभागात लिखित स्वरूपात असतात. त्यामुळे परस्पर रक्त कोणालाही विक्री केले जात नाही. गरजू रूग्णांनाच रक्त पिशव्यांचा मोफत पुरवठा केला जातो. तर इतर जणांनी मागणी केल्यास शासकीय दरानुसार रक्त पुरवठा केला जातो, असे रक्तपेढी विभागातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीBlood Bankरक्तपेढीHingoli civil hospitalजिल्हा रुग्णालय हिंगोली