शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पवारांची साथ सोडली, भाजपमध्ये आले अन् आता थेट राज्यसभा! रामराव वडकुते यांना 'लॉटरी'

By रमेश वाबळे | Updated: March 4, 2026 12:53 IST

हिंगोलीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष! धनगर समाजाला प्रतिनिधित्व देत भाजपने साधलं समीकरण

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधान परिषद सदस्य रामराव वडकुते यांना भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेची ‘लॉटरी’ लागली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वडकुते ४ फेब्रुवारी रोजी तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत.

राजकीय प्रवासाचा टप्पारामराव वडकुते हे धनगर समाजाचे प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. प्रदीर्घ काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या वडकुते यांनी शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून काम केले होते. २००२ मध्ये अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद आणि त्यानंतर विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागली होती. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपकडून पुनर्वसनभाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडे हिंगोली लोकसभा प्रभारी आणि जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरू होती. अखेर आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांना संधी देऊन हिंगोली जिल्ह्याला संसदेत प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Nominates Ramrao Wadkute for Rajya Sabha Seat

Web Summary : BJP nominated former MLA Ramrao Wadkute, a prominent Dhangar leader, for Rajya Sabha. Wadkute, previously with NCP, joined BJP in 2019. This decision has energized Hingoli BJP workers.
टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाHingoliहिंगोली