शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

हिंगोलीत दुचाकी चोरी करणारी टोळी पकडली; १७ दुचाकी जप्त 

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: May 31, 2023 4:13 PM

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या.

हिंगोली : जिल्हा व परजिल्ह्यात दुचाकीची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. त्यांच्याकडून एकूण १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या.

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे दुचाकीमालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांना दिल्या होत्या. दरम्यान, नर्सी ना. पोलिस ठाण्यात २९ मे रोजी दुचाकी चोरीसंदर्भात एक गुन्हा नोंद झाला होता. यात योगेश तान्हाजी शिंदे (रा. सिद्धेश्वर), दशरथ लालसिंग पवार (रा. पेडगाव) यांचा सहभाग असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने दोघांनाही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी नर्सी ना., वसमत ग्रामीण, सातारा (जि. छत्रपती संभाजीनगर) पोलिस ठाणे हद्दीतूनही दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्याचेकडून ६ लाख रूपये किमतीच्या ९ दुचाकी जप्त केल्या.

कळमनुरी तालुक्यातील पार्डी मोड येथील गजानन कामाजी पवार याचेकडूनही पोलिासांनी ५ लाख ७० हजार रूपये किमतीच्या ८ दुचाकी जप्त केल्या.  ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक एस.एस. घेवारे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार लिंबाजी वाव्हळे, भगवान आडे, गजानन पोकळे, नितीन गोरे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, नरेंद्र वाळवे, प्रशात वाघमारे यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली