शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलमध्ये व्यंगचित्र बनवून विद्यार्थ्यास मारहाण; तीन महिन्यांनंतर गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 19:34 IST

एका विद्यार्थ्यांसह त्याच्या वडिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील पळशी येथील एका खाजगी विद्यालयातील माधव भिसे या विद्यार्थ्याचे आदिनाथ भिसे याने मोबाईलवर व्यंगचित्र बनवून त्यास चिडविले. याबाबत विचारणा केली असता माधव यास मारहाण केल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्यात २५ डिसेंबर रोजी एका विद्यार्थ्यांसह त्याच्या वडिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पळशी येथील खाजगी विद्यालयात अकरावीत शिक्षण घेत असलेल्या माधव भिसे (रा. साबलखेडा) या विद्यार्थ्याचे मोबाईलमध्ये छायाचित्र काढून इयता बारावीतील विद्यार्थी आदिनाथ भिसे (रा. साबलखेडा; याने छायाचित्रास मुलीचा पेहराव करीत सदरील व्यंगचित्र शाळेतील मुलांना दाखवीत माधवला चिडवण्याचा प्रकार केला. याबाबत माधवने त्याच्या वडिलांना माहिती दिली. तसेच असा असा प्रकार करु नकोस म्हणून आदिनाथला समजावून सांगण्यासाठी त्याच्या वडिलांना सांगितले. परंतु याबाबत कुठलीही दखल न घेता उलट  आदिनाथ आणि त्याच्या वडिलांनी माधव यास वाटेत अडवून शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी नारायण श्रीराम भिसे यांच्या फिर्यादीवरून गोरेगाव ठाण्यात विद्यार्थी आदिनाथ खंडुजी भिसे आणि त्याचे वडिल खंडूजी फकीरा भिसे (दोघे रा. साबलखेडा) यांच्याविरूद्ध २५ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला.

उशिराने गुन्हा दाखल...याबाबत फिर्यादी नारायण भिसे यांना संपर्क केला असता ते म्हणाले तक्रार देण्यासाठी ठाण्यात गेलो, परंतु तेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. याबाबत पोलीस अधीक्षकांकडे विनंती केली. तेव्हा कुठे गुन्हा दाखल करून घेण्यात आला  असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीHingoliहिंगोलीSchoolशाळा