शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
5
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
6
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
7
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
8
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
9
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
10
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
11
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
12
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
13
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
14
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
15
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
16
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
17
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
18
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
19
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बाजोरियांच्या एन्ट्रीने घोडेबाजाराची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:22 IST

विधान परिषदेच्या हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून अकोल्याचे आ.श्रीकिशन बाजोरिया यांचे चिरंजीव विपुल बाजोरिया हे शिवसेनेकडून इच्छुकांच्या यादीत आल्याने मतदारांत घोडेबाजाराची आस वाढली आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यातील इच्छुकांत आता बाहेरच्या उमेदवाराचीही भर पडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विधान परिषदेच्या हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून अकोल्याचे आ.श्रीकिशन बाजोरिया यांचे चिरंजीव विपुल बाजोरिया हे शिवसेनेकडून इच्छुकांच्या यादीत आल्याने मतदारांत घोडेबाजाराची आस वाढली आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यातील इच्छुकांत आता बाहेरच्या उमेदवाराचीही भर पडली आहे.या मतदारसंघात राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी हे विद्यमान आमदार आहेत. आघाडीत पूर्वी ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली होती. यावेळी आघाडीत ती काँग्रेसला सोडवून घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे आधीच काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्हींच्याही गोटात अस्वस्थता आहे. त्यातच शिवसेना व भाजपची युती होण्याऐवजी वेगळी चूल मांडली जाण्याचे संकेत प्राप्त होत असल्याने या निवडणुकीत प्रचंड घोडेबाजार होण्याचे आखाडे बांधले जात आहेत. सर्वपक्षीय जि.प.सदस्य, नगरसेवक, पं.स.सभापतींना दिग्गज नेते मैदानात उतरले तरच आपल्याला योग्य ‘सन्मान’ मिळेल, असे वाटत आहे.राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांच्यासह दिलीप चव्हाण, जगजित खुराणा हे इच्छुक होते. मात्र आता केवळ दुर्राणी हेच एकमेव दावेदार उरतील, अशी चिन्हे दिसत आहेत. त्याचबरोबर भाजपकडून माजी आ.कै. कुंडलिक नागरे यांचे चिरंजीव सुरेश नागरे हे मोट बांधताना दिसत होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपकडील संख्याबळ अतिशय नगण्य म्हणजे ५१ एवढेच आहे. त्यातच ९७ एवढे संख्याबळ असलेल्या शिवसेनेचा युतीत आधार मिळेल, असे वाटत असताना सेनेकडून विपुल बाजोरिया हे दंड थोपटत असल्याने भाजपच्या गोटातही खळबळ माजली आहे.सर्वाधिक १६२ एवढे संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीला योग्य उमेदवाराचा अजूनही शोध आहे की काय? असे एकंदर चित्र आहे. तर काँग्रेसचे १३५ एवढे संख्याबळ असून एका काँग्रेस नेत्याच्या आघाडीचेही संख्याबळ दिमतीला आल्यास दीडशेचा आकडा गाठू शकतात. त्यामुळे काँग्रेसकडूनही सुरेश वरपूडकर, सुरेश देशमुख यांच्या नावाची चर्चा होत आहे. त्याचबरोबर बीड-लातूरची जागा राष्ट्रवादीला सोडून परभणी-हिंगोलीची जागा काँग्रेस पदरात पाडून घेणार असल्याच्याही वावड्या उठत आहेत. त्याला अजून कुणीही अधिकृत दुजोरा दिला नसला तरीही हा एक पर्यायही चर्चेत येत आहे.या निवडणुकीत समोर आलेली नावे ही दिग्गजांचीच असल्याने घोडेबाजार मात्र चांगलाच फोफावणार असल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघातील मतदारांचे लक्ष या सर्व घडामोडींवर असून याच एका प्रकाराची चर्चा होताना दिसत आहे. जवळपास चाळीस ते बेचाळीस मतदार अपक्ष व इतर पक्षीय असून त्यांना तर सध्या चांगलाच ‘सन्मान’ मिळण्याची चिन्हे आहेत. एकंदर आता या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून इच्छुक सर्वपक्षीय जि.प.सदस्य, नगरसेवकांच्या भेटी-गाठी घेत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण