शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

निर्दयीपणे कयाधू नदीपात्रात फेकले अर्भक, पोलिसांकडून मातापित्याचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 18:28 IST

कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील धक्कादायक प्रकार

- रमेश कदम आखाडा बाळापूर ( हिंगोली) : डोंगरगाव पूल येथील कयाधू नदीपात्रात एक पुरुष जातीचे मृत अर्भक वाहत आल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली. नदीपात्रावरील पुलाच्या कठड्याला अडकलेले हे मृत अर्भक पोलिसांनी बाहेर काढले असून त्याच्या मात्या-पित्याचा शोध घेण्यात येत आहे. चक्क अर्भक नदीत फेकल्याच्या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.

कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील निजाम कालीन पुलाच्या कठड्याला पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेले पुरुष जातीचे मृत अर्भक अडकले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार पाहून ग्रामस्थांनी आखाडा बाळापूर पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गोटके, जमादार शिवाजी पवार, सरकटे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. 

यावेळी पोलिसांना पाण्याच्या प्रवाहात एक पुरुष जातीचे अर्भक वाहून आलेले आढळून आले. मृत अवस्थेत असलेले हे अर्भक पाण्यात तरंगत होते . पोलिसांनी त्याला बाहेर काढले . नाळ असलेले अर्भक नदीच्या पात्रात कुणीतरी फेकून दिले. ते वाहत-  वाहत डोंगरगाव येथील कयाधू नदीच्या पात्रातील जुन्या पुलाला अडकले. पोलिसांनी ते अर्भक बाहेर काढले असून आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे . हे अर्भक नेमके कोणी फेकले ? त्याचे माता-पिता कोण आहेत? याचा शोध बाळापुर पोलीस घेत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीriverनदीCrime Newsगुन्हेगारी