लोककला, पथनाट्याद्वारे जनजागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:30 IST2021-03-16T04:30:49+5:302021-03-16T04:30:49+5:30
हिंगोली : तालुक्यातील माळहिवरा, डिग्रस कऱ्हाळे या गावांमध्ये कोरोना संसर्गाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. १२ मार्च रोजी जिल्हा माहिती ...

लोककला, पथनाट्याद्वारे जनजागृती कार्यक्रम
हिंगोली : तालुक्यातील माळहिवरा, डिग्रस कऱ्हाळे या गावांमध्ये कोरोना संसर्गाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. १२ मार्च रोजी जिल्हा माहिती कार्यालय, संत गजानन महाराज लोककला व पथनाट्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना संसर्गाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. कोरोना काळात विनाकारण फिरु नका, तोंडाला मास्क लावा, सॅनिटायझरचा पुरेपूर वापर करा, याबाबतची माहिती या जनजागृती कार्यक्रमातून देण्यात आली. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहितीही देण्यात आली. यावेळी शाहीर संतोष खडसे, भगवान कांबळे, अमोल वानखेडे, साहेबराव पडघान, ढोलकी वादक गौतम जोंधळे, हार्मोनियम वादक संतोष कांबळे, गजानन खडसे, प्रकाश खडसे, आशिष खडसे, गौतम कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे अध्यक्ष नामदेव कल्याणकर व अर्जुन कल्याणकर यांनी सहकार्य केले.
फोटो १