वीज कंपनीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST2021-02-06T04:54:55+5:302021-02-06T04:54:55+5:30

महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात ढकलणाऱ्या महावितरणविरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन भाजपच्या वतीने करण्यात आले. येथील सहाय्यक अभियंता ...

Avoid knocking on the power company's office | वीज कंपनीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

वीज कंपनीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात ढकलणाऱ्या महावितरणविरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन भाजपच्या वतीने करण्यात आले. येथील सहाय्यक अभियंता वीज कंपनीच्या कार्यालयासमोर शासनाच्या या कारभाराबद्दल संताप व्यक्त करीत, घोषणा देण्यात आल्या. तसेच कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्यात आले. महावितरणने ग्राहकांविषयी वेळीच जागृत झाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

या आंदोलनात माजी सभापती दिनकरराव देशमुख, माजी सभापती आप्पासाहेब देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यभान ढेंगळे, विलास खाडे, हिंमत राठोड, अजय विटकरे, श्रीरंग राठोड, विजय डोकळे, विजय धाकतोडे, बबन सुतार, विलास तिडके, दत्तरव तिडके, अनिल नागरे, गजानन सोनुने, मुन्ना मुंढे, विठ्ठल धाकतोडे, नारायण हराळ, दशरथ मुडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो १७

Web Title: Avoid knocking on the power company's office