सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत वाढ, दहा दरवाजे उघडले
By यशवंत भीमराव परांडकर | Updated: September 18, 2022 19:20 IST2022-09-18T19:10:04+5:302022-09-18T19:20:29+5:30
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला

सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत वाढ, दहा दरवाजे उघडले
औंढा नागनाथ(जि. हिंगोली): तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. रविवारी धरणाचे १० दरवाजे ०.३ मीटरने उघडले. ८ हजार २२५ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात सोडण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावाला प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरण परिसरात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीत लगातार वाढ होत आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरण प्रशासनाकडून धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय अभियंता खलिद सय्यद यांनी दिली.