पैशाच्या वादातून मालवाहू गाडी जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 20:50 IST2021-02-27T20:49:28+5:302021-02-27T20:50:03+5:30
वसमत - परभणी रोडवर पैशाच्या देवाण- घेवाणीवरून त्यांना थापड बुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली.

पैशाच्या वादातून मालवाहू गाडी जाळण्याचा प्रयत्न
वसमत (जि. हिंगोली): पैशाच्या देवाण- घेवाण वरून झालेल्या वादातून मारहाण करून मालवाहू गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात एका विरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.
याप्रकरणी श्यामराव भीमराव खिल्लारे (रा. पिंपरी महिपाल, जि. नांदेड) यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, वसमत - परभणी रोडवर पैशाच्या देवाण- घेवाणीवरून त्यांना थापड बुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली. बॉटलमध्ये आणलेले पेट्रोल त्यांच्या मालवाहू गाडीवर टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला असल्याची तक्रार त्यांनी दिली. तक्रारीवरून शहर पोलिसांनी रावसाहेब नागोराव नरवाडे (रा. पिंपरी महिपाल, जि. नांदेड) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शेख हकीम हे करत आहेत.