परिचितांकडूनच होताहेत महिलांवर अत्याचार...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:27 IST2021-03-14T04:27:09+5:302021-03-14T04:27:09+5:30
शासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. जिल्हास्तरावर पोलीस विभागाच्या वतीने भरोसा ...

परिचितांकडूनच होताहेत महिलांवर अत्याचार...!
शासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. जिल्हास्तरावर पोलीस विभागाच्या वतीने भरोसा सेल उभारण्यात आला आहे. या माध्यमातून महिलांच्या समस्या सोडविण्याचे काम प्राधान्याने केले जात आहे. त्यामुळे अत्याचारित महिलांना पोलीस विभाग आपलासा वाटत असल्याने अन्याय, अत्याचाराविरूद्ध लढण्यासाठी समोर येत आहेत. यातूनच महिला अत्याचारांच्या सर्व प्रकरणांत मिळून २०१९ मध्ये एकूण २६५ तर २०२० मध्ये १९५ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये हुंडाबळी, बलात्कार, विनयभंग केल्याप्रकरणीही गुन्हे दाखल झाले आहेत.
एकीकडे महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल होत असले तरी महिलांवरील अत्याचार प्रकरणामध्ये परिचित व्यक्तींचाच सहभाग जास्त असल्याचे दिसून येत आहे. याबाबत आढावा घेतला असता महिला व मुली यांच्यावरील बलात्कारप्रकरणी गुन्ह्यात मागील तीन वर्षांत ३० परिचित व्यक्तींकडून अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अपरिचित व्यक्तींकडून एकही अत्याचार झाला नाही. त्यामुळे परिचित व्यक्तींकडून होणारे अत्याचार रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे.
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
जिल्ह्यात परिचित व्यक्तींकडूनच सर्वात जास्त महिलांवर अत्याचार होत आहेत. यामध्ये हुंडाबळी, विनयभंग यासह लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात येत असल्याच्या प्रकरणाचा समावेश आहे. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
वर्षनिहाय आकडेवारी
गुन्हा संख्या
बलात्कार २०२० २०१९
१६ १८
विनयभंग ७४ ६८
हुंडाबळी ०५ ०४