तीन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

By Admin | Updated: June 25, 2014 00:41 IST2014-06-25T00:17:55+5:302014-06-25T00:41:26+5:30

हिंगोली : दवाखाना बांधण्यासाठी माहेराहून १० लाख रूपये आणण्याची मागणी करीत शारिरिक व मानसिक छळ करून डॉक्टर विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी

The application for bail for three accused was rejected | तीन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

तीन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

हिंगोली : दवाखाना बांधण्यासाठी माहेराहून १० लाख रूपये आणण्याची मागणी करीत शारिरिक व मानसिक छळ करून डॉक्टर विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जेलची हवा खात असलेल्या तीन आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. ही घटना कळमनुरी शहरात १५ मे रोजी घडली असून पतीसह सासू-सासरा, दीर हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.
औंढा तालुक्यातील लाख येथील अ.भा.मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव लोंढे यांची मुलगी डॉ. सोनाली हिचा विवाह कळमनुरी येथील डॉ. मुकेश लक्ष्मणराव श्ािंदे याच्याशी दोन वर्षापुर्वी झाला होता. लग्नानंतर दवाखाना बांधण्यासाठी सासरच्या मंडळींकडून १० लाखाची मागणी करून सतत डॉ. सोनाली हिचा छळ करण्यात येऊ लागला. सासरच्या या जाचाला कंटाळून डॉ. सोनाली शिंदे हिने कळमनुरीतील विद्या नगरात राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणी त्र्यंबक चंपतराव लोंढे (रा.लाख ह.मु. हिंगोली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुकेश शिंदे (पती), लक्ष्मणराव गणपतराव शिंदे (सासरा), हेमलता लक्ष्मणराव शिंदे (सासू), मयूर उर्फ महेश लक्ष्मणराव शिंदे (दीर, सर्व रा.विद्यानगर, कळमनुरी) यांच्याविरूध्द कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींना अटक केली. सुरूवातीला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. दरम्यान, आरोपी लक्ष्मणराव शिंदे , हेमलता शिंदे , मयूर शिंदे यांच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी २० जून रोजी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी होऊन न्यायालयाने हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचा शेरा देत तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. ज्ञानदेव टेकनूर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: The application for bail for three accused was rejected