जागतिक महिला दिन साजरा करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST2021-03-06T04:28:45+5:302021-03-06T04:28:45+5:30

महिलांचे मनोधैर्य व स्त्रीत्वाच्या सन्मानार्थ जगभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महिलांप्रति जिव्हाळा, ...

Appeal to celebrate International Women's Day | जागतिक महिला दिन साजरा करण्याचे आवाहन

जागतिक महिला दिन साजरा करण्याचे आवाहन

महिलांचे मनोधैर्य व स्त्रीत्वाच्या सन्मानार्थ जगभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महिलांप्रति जिव्हाळा, आदर व्यक्त करण्याबरोबरच सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात दाद मिळावी यासाठी महिला दिन साजरा करण्याचा उद्देश आहे.

कार्यक्रमास महिलांविषयी तळमळीने काम करणाऱ्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात यावे. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुढीलप्रमाणे शपथ घेण्यात यावी. ‘मी घरात, कार्यालयात, समाजात आपल्या आजूबाजूच्या परिसरात मुलामुलींमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. मुली व महिलांवर कोणत्याही प्रकारचा शारीरिक व मानसिक अत्याचार होत असल्यास त्याचा विरोध करीन. मुली व महिलांच्या प्रतिष्ठेस हानी पोहोचेल असे कोणतेही कृत्य करणार नाही. त्यांच्या हक्कांचा व प्रतिष्ठेचा आदर ठेवीन.’

या कार्यक्रमात मुली व महिलांच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने लिंगभेद संवेदनशीलता, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, मुलींची छेडछाड व कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध, मुलींचे घटते प्रमाण, हुंडा प्रतिबंध कायद्यासंदर्भात अंमलबजावणी या बाबीवर प्रबोधन करण्यात यावे, असेही पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Appeal to celebrate International Women's Day