डिग्रस कऱ्हाळे येथे श्री १००८ पार्श्वनाथ भगवंतांचा वार्षिक महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:27 IST2021-02-14T04:27:34+5:302021-02-14T04:27:34+5:30
डिग्रस कऱ्हाळे: हिंगोली तालक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील दिगंबर जैन मंदिरात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी १४ फेब्रुवारी रोजी श्री १००८ पार्श्वनाथ ...

डिग्रस कऱ्हाळे येथे श्री १००८ पार्श्वनाथ भगवंतांचा वार्षिक महोत्सव
डिग्रस कऱ्हाळे: हिंगोली तालक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील दिगंबर जैन मंदिरात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी १४ फेब्रुवारी रोजी श्री १००८ पार्श्वनाथ भगवंतांचा वार्षिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त रविवारी दिवसभर धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत.
वार्षिक महोत्सवासाठी प. पू. १०८ विशेष सागर महाराजांचे शिष्य विश्वमार्दव महाराजांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी जैन मंदिरात भगवंतांचा पंचामृत अभिषेक, शांती विधान पूजा होणार आहे. सायंकाळी सात वाजता भगवंतांची आरती होणार असून दिवसभर धार्मिक कार्यक़्रम होणार आहेत. या कार्यक्रमासाठी हिंगोली, पिंपळदरी, शिरडशहापूर, कळमनुरी, वसमत, आसेगाव, परभणी येथील जैन भाविक सहभागी होणार आहेत.
१४ फेब्रुवारी रोजी शिरडशहापूर येथील संगीतकार शीखरचंद जैन व त्यांच्या चमूकडून संगीतमय पूजा होणार आहे. शिरडशहापूर येथील श्रावक कैलास मुक्कीरवार, गजेंद्र मुक्कीरवार यांच्या तर्फे महाप्रसाआची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. फाेटाे नं. ०१