शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आधीच पावसाची पाठ त्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव; डोळ्यादेखत कापसाच्या पिकाची नासाडी

By विजय पाटील | Updated: October 6, 2023 17:34 IST

वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी वैतागले; बोंडांनी लगडलेल्या कापसाची डोळ्यांदेखत केली नासाडी

हिंगोली: सेनगाव तालुक्यातील कडोळी व परिसरात मागच्या काही दिवसांपासून रोहिंची संख्या वाढली असून खरीप पिकांचे नुकसान करत आहेत. याबाबत वन विभागाला अनेकवेळा सांगण्यात आले. परंतु अद्यापही वन विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या एक एकरातील कापसाची नासाडी झाली आहे. या भागात रोहिंबरोबर अन्य वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात शेत शिवारात वावरत आहेत.

एकीकडे पावसाने पाठ फिरविली आहे तर दुसरीकडे वन्यप्राणी पिकांची नासाडी करीत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. खरीप हंगाम सुरु झाल्यापासून रोही, नीलगाय, वानरे, रानडुकरे आदी वन्यप्राणी कडोळी व परिसरातील पिकांची नासाडी करीत आहेत. वन्यप्राण्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर ते अंगावर धावून येवून हल्ला करत आहेत, असेही या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. कडोळी येथील अशोक ओंकार जिरवणकर यांच्या गट क्रमांक ३२४ मध्ये त्यांनी कापसाची लागवड केली. कमी-जास्त पावसामुळे कापूसही चांगले आले. परंतु बोंडांनी लगडलेल्या कापसाची नासाडी केली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.एक एकरात केली नासाडी...यावर्षी कापसासाठी भरपूर प्रमाणात मशागत केली. परंतु रोहिंनी बोंडांनी लगडलेल्या कापसाची नासाडी केली. त्यामुळे खरीप हंगामात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मशागत केल्यामुळे कापसाचे पीकही चांगले उगवले होते. मागच्या काही दिवसांपासून कडोळी व परिसरात रोहिंची संख्या वाढली आहे. या रोहिंना हाकलण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धावून येत आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, नामदेव पंतगे, संतोष माहोरकर आदींनी पाहणी करून वनविभागाना कळविले. तर वनविभागाने शेतकऱ्याला ऑनलाइन नुकसानीची तक्रार देण्यास सांगितली. यानंतर वनविभागाचे कर्मचारी येऊन पंचनामा करतील, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीforestजंगलHingoliहिंगोली