शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
3
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
4
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
5
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
6
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
7
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
8
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
9
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
10
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
11
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
12
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
13
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
14
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
15
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
16
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
17
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
18
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
19
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
20
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?

औंढा तहसीलच्या प्रांगणातच हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:16 AM

जमिनीच्या जुन्या वादातून तहसीलच्या प्रांगणात चौकशीसाठी आलेल्या दोन गटांत फिल्मीस्टाईलने मारहाण झाल्याची घटना २२ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता घडली. यात चार गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनीच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : जमिनीच्या जुन्या वादातून तहसीलच्या प्रांगणात चौकशीसाठी आलेल्या दोन गटांत फिल्मीस्टाईलने मारहाण झाल्याची घटना २२ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता घडली. यात चार गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनीच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.औंढा ना. तालुक्यातील रांजाळा येथील दिनाजी श्रीखंडे, राजू दिनाजी श्रीखंडे, गजानन श्रीखंडे, माया दिनाजी श्रीखंडे, कावेरी श्रीखंडे हे त्यांचा गट क्र. २१४ व गट क्र. ५३ या जमिनीचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. जुलै महिन्यात हट्टा पोलिसांनी जमिनीवरून सतत वाद होत असल्याने ही जमीन शासनाच्या ताब्यात घेण्याचा अहवाल तहसीलदारांना दिला होता.त्यानुसार सुनावणीसाठी सोमवारी दोन्ही गटांना चौकशीसाठी तहसील कार्यालयात दुपारी ४ वाजता बोलाविले होते; परंतु तत्पूर्वीच सुरूवातीला १ च्या सुमारास किरकोळ बाचाबाची झाली. नंतर दुपारी २.३० वाजता थेट हाणामारीत झाली. यात आरोपींनी चैन, काठ्या, कोयते व कुºहाडीचा वापर करून चौघांना गंभीर केले. तसेच पायाला मुरगाळून पायच निकामी करण्याचा प्रयत्न केला.हा सर्व प्रकार पाहण्यासाठी गर्दी झाली होती. मात्र भांडण सोडविण्यास कुणीही समोर आले नाही. शेवटी महसूल प्रशासनानेच पुढाकार घेऊन पोलिसांना पाचारण केले होते. त्यानंतर पुढील प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. कावेरीबाई श्रीखंडे यांच्या फिर्यादीवरून चक्रधर वैद्य, आकाश वैद्य, ज्ञानेश्वर आल्हाट या तिघांविरूद्ध अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.