अगरबत्तीमुळे दानपेटी स्वाहा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:15 IST2018-05-30T00:15:15+5:302018-05-30T00:15:15+5:30
कळमनुरी तालुक्यात कृष्णापूर येथे जागृत देवस्थान असलेल्या महादेव मंदिरातील दानपेटीवर भाविकांनी लावलेल्या अगरबत्तीमुळी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आग लागली. ही बाब येताच त्यावर पाणी टाकून विझवण्यात आले. मात्र यात काही नोटा जळाल्या असून नेमके किती नुकसान झाले, याची अधिकृत माहिती मिळाली नाहीे.

अगरबत्तीमुळे दानपेटी स्वाहा !
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यात कृष्णापूर येथे जागृत देवस्थान असलेल्या महादेव मंदिरातील दानपेटीवर भाविकांनी लावलेल्या अगरबत्तीमुळी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आग लागली. ही बाब येताच त्यावर पाणी टाकून विझवण्यात आले. मात्र यात काही नोटा जळाल्या असून नेमके किती नुकसान झाले, याची अधिकृत माहिती मिळाली नाहीे.
पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून कृष्णापूर येथील महादेव मंदिर प्रसिध्द आहे. बाळापूरसह कळमनुरी, हदगाव तालुक्यातील भक्तगण येथे दर्शनासाठी येत असतात.२९ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मंदिरातील दानपेटीला अचानक आग लागली. धूर अन् जाळ दिसल्याने भक्तांनी धावाधाव केली.पेटीवर पाणी टाकून आग विझवली. पुजाऱ्याने विश्वस्त मंडळ व बाळापूर पोलिसांना सूचना दिल्या. ठाणेदार व्यंकट केंद्रे तात्काळ पथकासह हजर झाले. विश्वस्त मंडळही हजर झाले. दानपेटी उघडली. पाणी टाकल्याने व जळालेल्या नोटा चिकटलेल्या आढळल्या. त्यामुळे तूर्त पूर्ण मोजणी केली नाही. तर पेटीत अगरबत्तीच्या काड्या व जळत्या अगरबत्त्या आढळल्या. त्यामुळे कोणीतरी भक्ताने दानपेटीवर अगरबत्ती लावल्यानेच आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.