शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धेश्वर धरणातून पाणी उपसा करणाऱ्या २११ शेतकऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 15:29 IST

येथील  शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : तालुक्यातील सिद्धेश्वर धरणावर असलेल्या तीन गेटवरून अवैध पाणी उपसा करणाऱ्या २११ शेतकऱ्यांवर  कारवाई करण्यात आली आहे. 

धरणातून पाणी उपसा करू नये, असे वारंवार सांगूनही शेतकरी ऐकत नसल्याने ढेगज शिवार, वडचुना व दुरचुना येथील  शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. सिद्धेश्वर तलावातून अवैधरीत्या पाणी उपसा करणारे पंपसेट व साहित्यांचे कनेक्शन तोडल्याची कार्यवाही अवैध पाणी उपसा प्रतिबंध पथकाचे प्रमुख तथा औंढा येथील नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव व कनिष्ठ अभियंता अंकित तिवारी यांनी केली. तीन गेट परिसरातील ढेगज शिवार, वडचुना व दूरचुना तलाव क्षेत्रातील अवैध मोटारीची पाहणी केली असता यावेळी त्यांना कनेक्शन दिसून आले.

मात्र सदरील शेतकऱ्यांनी त्यांचे केबल व स्टार्टर जवळपास बऱ्याच जणांनी कनेक्शन कट होण्याचा अंदाज येताच ते घेवून गेले. तसेच महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे सिद्धेश्वर तीन गेटजवळील १६ (एक डीपी), ढेगज शिवरातील ८० (दहा डीपी) व वडचुना शिवारातील ७५ (दहा डीपी), दुरचूना शिवारातील ४० (६ डीपी) एकूण २११ शेतकऱ्यांचा वीज पुरवठा कायमचा खंडित करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मिळेपर्यंत सुरू करण्यात येऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

धरणात मृत साठा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार  पांडुरंग माचेवाड, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अंकित  तिवारी, महावितरणचे अभियंता जैन, ए.आर. मेश्राम यांनी संयुक्त कार्यवाही केली आहे.  सिद्धेश्वर धरणातील पाणी पिण्यासाठी  राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय या धरणातील पाणीसाठा मृत साठ्यात आहे. त्यामुळे अवैध पाणी उपसा करणाऱ्याविरुद्ध जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाचे उप विभागीय अधिकारी वसमत व तहसीलदार औंढा नागनाथ यांनी दिले होते.

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी